---Advertisement---

INDvsSA 3rd T20: ‘करो या मरो’ सामन्यात खेळपट्टी कुणाच्या फायद्याची? पाऊस करणार का एन्ट्री? वाचा सगळं काही

INDvsSA
---Advertisement---

INDvsSA 3rd T20: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेचा शेवट गुरुवारी (दि. 14 नोव्हेंबर) होत आहे. जोहान्सबर्ग येथील न्यू वाँडरर्स स्टेडिअम तिसऱ्या आणि अखेरच्या टी20 सामन्यासाठी सज्ज झाले आहे. खरं तर, या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती. अशात तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारतीय संघ मालिका 1-1ने बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल. अशात खेळपट्टी आणि हवामानाविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात…

कशी असेल खेळपट्टी?
जोहान्सबर्ग येथील न्यू वाँडरर्स स्टेडिअमच्या (New Wanderers Stadium, Johannesburg) खेळपट्टीवर चौकार-षटकारांची बरसात पाहायला मिळू शकते. कारण, ही खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. अशात दोन्ही संघांच्या फलंदाजांना धावांचा पाऊस पाडण्याची संधी मिळणार आहे.

दुसऱ्या टी20तही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल दिसत होती आणि संघांच्या फलंदाजांनी याचा भरपूर फायदाही घेतला होता. आता अशात पुन्हा एकदा दोन्ही संघांकडून मोठमोठे फटके पाहायला मिळू शकतात. खेळपट्टीतून फलंदाजांना मदत मिळणार असल्यामुळे तिसरा सामनाही मोठ्या धावसंख्येचा होण्याची शक्यता आहे.

या मैदानावर आतापर्यंत एकूण 26 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले गेले आहेत. यातील प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 13 वेळा, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी 13 सामने जिंकले आहेत. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या जवळपास 171 मानली जाते.

पाऊस पडेल का?
मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पावसाची एन्ट्री झाली होती. मात्र, आता तिसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, रात्री उशिरा होण्याची शक्यता आहे.

संघात होणार बदल?
दुसऱ्या टी20त भारतीय सलामी जोडीने संघाला निराश केले होते. दोन्ही सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि शुबमन गिल शून्यावर बाद झाले होते. खरं तर, ऋतुराज गायकवाड आजारी असल्यामुळे तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. आता हे पाहावे लागेल की, जर ऋतुराज फिट झाला, तर त्याला संधी मिळते की नाही.

याव्यतिरिक्त गोलंदाजीविषयी बोलायचं झालं, तर दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाजांनी निराश केले होते. खासकरून अर्शदीप सिंग दुसऱ्या सामन्यात महागडा ठरला होता. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया मालिकेत शानदार प्रदर्शन करणाऱ्या रवी बिश्नोईलाही दुसऱ्या सामन्यात संधी दिली गेली नव्हती. अशात तिसऱ्या टी20त भारतीय संघात एक-दोन बदल करण्याचा विचार केला जाऊ शकतो. (india vs south africa 3rd t20 new wanderers stadium johannesburg pitch report know here)

हेही वाचा-
राजकोटमध्ये घडला इतिहास, विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच खेळणार हरियाणा
पाकिस्तानचा घाम काढणार वॉर्नर, कारकिर्दीतील शेवटची मालिका राहणार लक्षात; आकडेवारी पाहून तुम्हालाही येईल अंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---