क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक भावांच्या जोड्या आहेत, ज्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. स्टिव्ह, मार्क वॉ पासून फ्लॉवर बंधू, पठाण बंधू, पंड्या बंधू अशी अनेक भावांच्या जोड्यांची उदाहरणे पाहायला मिळाली आहेत, ज्यांनी क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. या भावांच्या जोडीमध्ये टॉम आणि सॅम या करन बंधूंचाही समावेश आहे. काही वर्षांपूर्वी या दोन भावंडांनी इंग्लंडकडून पदार्पण केले होते. आता त्यांचा तिसरा भाऊ बेंजामिन (बेन) करन देखील क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.
बेन करनची वादळी खेळी
टॉम आण सॅम हे दोघे इंग्लंडमधील सरे या कौऊंटी संघाकडून खेळत असले तरी बेन नॉर्थम्पटनशायरकडून खेळतो. सध्या इंग्लंडमध्ये विटॅलिटी टी२० ब्लास्ट स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत बेनने तुफानी खेळ करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने ३० जून रोजी नॉर्थम्पटनशायर विरुद्ध डरहॅम संघाकडून खेळताना ३३ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार आणि १ षटकार मारला.
या खेळीवेळी त्याने केवळ १९ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. विशेष म्हणजे त्याने डरहॅमकडून खेळणाऱ्या बेन स्टोक्सविरुद्ध डावाच्या ६ व्या षटकांत सलग ४ चौकार मारत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळी व्यतिरिक्त प्रथम फलंदाजी करणाऱ्या नॉर्थम्पटनशायरकडून रिकार्डो वास्कोन्कोलोसने ६० धावांची खेळी केली. त्यामुळे नॉर्थम्पटनशायरने २० षटकांत ५ बाद १७३ धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल डरहॅमला सर्वबाद १४३ धावाच करता आल्याने हा सामना नॉर्थम्पटनशायरने ३० धावांनी जिंकला.
Watch the highlights from @curranjb_57's quick-fire knock 💪#Blast21 pic.twitter.com/Hw7G1HC458
— Vitality Blast (@VitalityBlast) July 1, 2021
टॉम आणि सॅम यांचा भावाची ताबडतोड खेळी पाहून जल्लोष
बेन जेव्हा ही ताबडतोड खेळी करत होता, तेव्हा टॉम आणि सॅम हे त्याचे भाऊ टॅबवर सामना पाहात होते. सध्या इंग्लंडची श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका सुरु आहे. यादरम्यान सॅम आणि टॉम यांनी एकत्र बसून आपल्या भावाच्या खेळीचा आनंद घेतला. यावेळी बेनच्या चांगल्या फटक्यावर ते जल्लोष करतानाही दिसले. ते दोघे बेनची खेळी पाहात असतानाचा व्हिडिओ सॅम बिलिंग्सने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता.
खरंतर सॅम, टॉम आणि बेन या तिघा भावांमध्ये खूप चांगले बाँडिंग आहे. ते नेहमी सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो पोस्ट करत असतात. तसेच एकमेकांचे कौतुकही करत असतात. काहीवर्षांपूर्वीच तिघांमध्ये सर्वात जेष्ठ असलेल्या टॉमने ट्विट करत म्हटले होते की एक दिवस ते तिघेही एकत्र खेळतील. या तिघांमध्ये टॉम जेष्ठ बंधू आहे, तर बेन मधला भाऊ असून सॅम सर्वात लहान आहे.
This is cute – Sam Curran and Tom Curran watching the batting of their brother Ben Curran in #T20Blast – he scored 62 runs from 33 balls including 11 fours and 1 six against Durham.
Credits – Sam Billings Instagram. pic.twitter.com/l6Y0JrCewG
— Johns. (@CricCrazyJohns) June 30, 2021
करन बंधूंच्या रक्तातच क्रिकेट
खरंतर करन बंधूंच्या रक्तातच क्रिकेट आहे, असे म्हणावे लागेल. या तिघा भावांचे वडील केविन करन हेही 14 वर्षे कौंटी क्रिकेट खेळले असुन त्यांनीही ग्लूस्टरशायर आणि नॉर्थम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र २०१२ ला जॉगिंग करत असताना त्यांचे हार्ट ऍटॅकने निधन झाले. त्यांचे वय त्यावेळी ५३ वर्षे होते. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले आहे. केविन करन हे १९८३ आणि १९८७ च्या विश्वचषकात झिम्बाब्वेकडून खेळले होते. यानंतर ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले.
केविन करन हे अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या प्रमाणेच टॉम आणि सॅम हे देखील अष्टपैलू खेळाडू आहेत. तर बेन वरच्या फळीतील फलंदाज आहे. टॉम आणि सॅमची अष्टपैलू शैली केविन करन यांच्याप्रमाणेच आहे. तर बेन हा डाव्या हाताने फलंदाजी करतो तर उजव्या हाताने गोलंदाजी करतो. टॉम आणि सॅम हे दोघेही उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. टॉम आणि सॅम या दोघांचे जर्सी क्रमांकही अनुक्रमे ५९ आणि ५८ असा आहे.
टॉम करनने आत्तापर्यंत २ कसोटी, २६ वनडे आणि २८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तर सॅमने २१ कसोटी, ९ वनडे आणि १६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
त्याचबरोबर केविन करन यांचे वडीलही क्रिकेटपटू होते. त्यांचे नावही केविन असेच असल्याने त्यांना सिनियर केविन असे म्हणतात. त्यांनी ७ प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत.
https://www.instagram.com/p/B3IZ2BsHVaD/
बेन करनची कारकिर्द
बेन करनने अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. त्याने आत्तापर्यंत २५ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ६ अर्धशतकांसह १०७५ धावा केल्या आहेत. तसेच ३ अ दर्जाचे आणि ७ टी२० सामने खेळले आहेत. त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये १ अर्धशतकासह १०२ धावा केल्या आहेत. तर टी२०मध्येही १ अर्धशतकासह १२३ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या माजी निवडसमिती अध्यक्षांनी फलंदाजांवर फोडले WTC फायनलमधील पराभवाचे खापर, म्हणाले…
ज्युनियर हार्दिकच्या जबरदस्त पावर हिटिंगने विरोधकांना फोडला घाम; १० वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
‘चांगलं काम केले भावा’, केदार जाधवने ‘तो’ फोटो पोस्ट करताच वॉर्नरने थोपटली पाठ