सुपर 12 फेरीत आयर्लंडकडून इंग्लंड संघाचा पराभव झाल्यानंतर चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, इंग्लंड संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचे विजेतेपद जिंकत आपण बलाढ्यच आहोत, हे दाखवून दिले. रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत करत टी20 विश्वचषकाची ट्रॉफी उंचावली. या सामन्यात अफलातून कामगिरी करत अष्टपैलू सॅम करन याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. हा विक्रम करणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला.
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान पहिल्यांदा फलंदाजीला उतरला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 137 धावा चोपल्या होत्या. यावेळी इंग्लंडकडून दमदार गोलंदाजी करताना सॅम करन याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यावेळी त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 12 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तानचे 138 धावांचे आव्हान इंग्लंडने 5 विकेट्स गमावत 19 षटकात पूर्ण केले. या विजयानंतर सॅमला त्याच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
विशेष म्हणजे, सॅमने फक्त या सामन्यातच नाही, तर या संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला मालिकावीर या पुरस्कारानेही गौरवण्यात आले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार जिंकणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला. (Sam Curran is the first ever player to win the MOS and MOM in the World Cup Finals)
Player of the Match ✅
Player of the Tournament ✅
Some cricketer, @CurranSM 👏 pic.twitter.com/9ABklZ7Gwn
— England Cricket (@englandcricket) November 13, 2022
सॅम करन याची टी20 विश्वचषक 2022मधील कामगिरी पाहिली, तर त्याने 6 सामन्यात 6.52च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली. यामध्ये त्याला 13 विकेट्स घेण्यात यश आले. यामध्ये 10 धावा देत 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली.
इंग्लंडने असा साकारला विजय
पाकिस्तानने दिलेल्या 138 धावांचे आव्हान इंग्लंडने सहजरीत्या 19 षटकात पार केले. यावेळी त्यांना 5 विकेट्स गमवावे लागले. इंग्लंडकडून यावेळी बेन स्टोक्स (Ben Stokes) याने सर्वाधिक धावा केल्या. स्टोक्सने 49 चेंडूत 52 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 5 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने 26, हॅरी ब्रूक याने 20 आणि मोईन अली याने 19 धावांचे योगदान दिले. (sam curran is the first ever player to win the mos and mom in the world cup finals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आतापर्यंत ‘या’ संघांनी उंचावलीय टी20 वर्ल्डकपची ट्रॉफी, विजेत्यांची संपूर्ण यादी एकाच क्लिकवर
नवे जगज्जेते! पाकिस्तानला नमवत इंग्लंडच्या शिरावर टी20 विश्वविजयाचा ताज; स्टोक्स पुन्हा हिरो