मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत इंग्लंड संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. इंग्लंडच्या या विजयात अष्टपैलू सॅम करन याने महत्त्वाची भूमिका बजावली. अंतिम सामन्यात तीन बळी मिळवण्यासह त्याने या स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवत स्पर्धेचा मानकरी होण्याचा मान मिळवला. विश्वचषकातील या दर्जेदार कामगिरीनंतर त्याने आपल्या खेळात सुधारणा होण्यासाठी आयपीएलची महत्त्वाची भूमिका राहिल्याचे म्हटले.
सॅम करन याची टी20 विश्वचषक 2022 मधील कामगिरी पाहिली, तर त्याने 6 सामन्यात 6.52 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली. यामध्ये त्याला 13 बळी घेण्यात यश आले. अफगाणिस्तानविरूद्ध 10 धावा देत घेतलेले 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली. सोबतच अंतिम सामन्यात त्याने केवळ 12 धावा देऊन तीन बळी आपल्या नावे केले. टी20 विश्वचषक इतिहासात अंतिम सामन्याचा मानकरी व स्पर्धेचा मानकरी होण्याचा बहुमान मिळवणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला.
अंतिम सामन्यानंतर बोलताना करन म्हणाला,
“संघाच्या व स्वतःच्या कामगिरीने मी आनंदी आहे. अशा मोठ्या व मोक्याच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची कला मी आयपीएलमध्ये शिकलो. लवकरच मी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दिसेल.”
सॅम करन हा आयपीएलमधील नामांकित खेळाडू म्हणून ओळखला जातो. अवघ्या तीन हंगामात त्याने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. पंजाब किंग्ससाठी आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खेळताना त्याने आपली ओळख बनवली. अष्टपैलू म्हणून त्याने आपली छाप पाडताना अनेक सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मागील वर्षी दुखापतीमुळे तो आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. त्यामुळे चेन्नईने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतलेला. मात्र, यंदा तो आयपीएल लिलावात दिसण्याची शक्यता आहे. तो आयपीएल लिलावात दाखल झाल्यास अनेक संघ त्याच्यासाठी मोठी बोली लावताना दिसतील.
(Sam Curran Said IPL Helps Me Lot I Will Back In IPL Soon)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाचा रे! इंग्लंडमुळे भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी फॅन्सला उचकवले, थेट ‘नागिन’ गाण्यावर लावले ठुमके
सेमीफायलमधून बाहेर पडूनही भारत ‘या’ यादीत दुसऱ्या स्थानी, इंग्लंडने ट्रॉफी जिंकून पटकावला तिसरा क्रमांक