पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित पहिल्या पीवायसी-रावेतकर फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत साखळी फेरीत खुल्या गटात सामुराईज, टायटन्स, निंजाज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
कर्वे रोड येथील फुटसॉल ५ या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत खुल्या गटात साखळी फेरीत टायटन्स संघाने आर्मडोज संघाचा 3-0 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. सामन्यात टायटन्सच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारला. 6व्या मिनिटाला आदित्य गांधीने मिळालेल्या संधीचे सोने करत गोल करून टायटन्स संघाचे खाते उघडले. पूर्वार्धात 1-0 अशी आघाडी कायम होती. उत्तरार्धातही टायटन्सच्या खेळाडूंनी जोरदार खेळ केला. 18व्या मिनिटाला आदित्य गांधीने आणखी एक गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोनच मिनिटांनी टायटन्सच्या देवेंद्र चितळेने गोल करून संघाची 3-0 अशी वाढवली. अखेरपर्यंत आर्मडोज संघाला टायटन्स संघाची बचावफळी भेदता आली नाही व सामन्यात टायटन्स संघाने आर्मडोजविरुद्ध 3-0 असा विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात निंजाज संघाने वॉरियर्स संघाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. निंजाज संघाकडून अनिश राणे(4, 27मि.)याने दोन गोल तर, जयदीप मराठे(13मि.) अविष्कार हुलयार(29मि.)यांनी प्रत्येकी एक गोल केला. अन्य लढतीत निशीत हेगडे(4, 8, 11, 18मि.)याने नोंदवलेल्या चार गोलांच्या जोरावर सामुराईज संघाने रेंजर्स संघाचा 6-3 असा पराभव करून तिसरा विजय नोंदवला.अतितटीच्या लढतीत सामुराईज संघाने टायटन्स संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले. सामुराईजकडून आर्य देवधर(20मि.)याने तर टायटन्सकडून आदित्य गांधी(6मि.)याने एक गोल केला.
13 वर्षांखालील गटात चुरशीच्या लढतीत शिल्ड व ऍव्हेंजर्स यांच्यातील सामना गोलशुन्य बरोबरीत सुटला. पण शिल्ड संघाने स्पर्धेत दोन विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
निकाल: साखळी फेरी: खुला गट:
सामुराईज: 1(आर्य देवधर 20मि.,)बरोबरी वि.टायटन्स: 1(आदित्य गांधी 6मि.);
टायटन्स: 3(आदित्य गांधी 6, 18मि., देवेंद्र चितळे 20मि.)वि.वि.आर्मडोज: 0;
निंजाज: 4(अनिश राणे 4, 27मि., जयदीप मराठे 13मि., अविष्कार हुलयार 29मि.)वि.वि.वॉरियर्स: 0;
सामुराईज: 6(निशीत हेगडे 4, 8, 11, 18मि., रोनीत मुथा 26मि.)वि.वि.रेंजर्स: 3(आत्मन बागमार 20मि., यश शहा 22मि., साहिल ठाकरे 30मि.);
13 वर्षांखालील गट:
शिल्ड: 0 बरोबरी वि.ऍव्हेंजर्स: 0.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video: कर्णधारानेच काढला कर्णधाराचा काटा! बुमराहने टिपला स्टोक्सचा नेत्रदीपक झेल
अँडरसनसोबत २०१४मध्ये झालेल्या वादाचे प्रत्यत्तुर जडेजाने तोंडाने नाहीतर बॅटने दिले