नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णदार संदीप लामिछाने याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले गेले होते. काही दिवसांपूर्वी त्यावरील हे आरोप न्यायलयात सिद्ध झाले. बुधवारी (10 डिसेंबर) झालेल्या अखेरच्या सुनावणीत न्यायलायकडून संदीपला झटका बसला. तब्बल 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा त्याला ठोठावण्यात आली आहे.
28 वर्षीय संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) नेपाळ संघाचा मोठा चेहरा होता आणि इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळला होता. मागच्या वर्षी त्याच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाले होते. डिसेंबर 2023च्या शेवटी हे लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध झाले. पण त्याचसोबत पीडित मुलगी शोषण झाले तेव्हा अल्पवयीन नव्हते असेही न्यायलयाने सांगितले होते. बलात्काराच्या आरोपांमध्ये दोषी आढळलेला संदीप इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडू राहिला आहे.
दरम्यान, बुधवारी (10 जानेवारी) झालेल्या सुनावणीमध्ये संदीपला किती वर्षांची शिक्षा होणार, हे ठरले. न्यायधीश शिशिर राज यांच्या ठकाल यांच्या खंडप त्याला 10 वर्षांची शिक्षा घोषित केली. तत्पूर्वी पीडित मुलीने काठमांडू पोलीस स्टेशनमध्ये संदीपविरुद्ध तक्रार दाखल केली होती. क्रिकेटपटूविरोधात ही तक्रार दाखल झाली, तेव्हा तो वेस्ट इंडीजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग खेळत होता. जमैका तल्लावाह संघासाठी खेळत असलेल्या संदीपला ही स्पर्धा अर्ध्यात सोडून मायदेशी परत यावे लागले.
त्याच्याविरोधात अरेस्ट वॉरंट निघाल्यानंतर त्याला तत्काळ मायदेसात बोलावले गेले होते. पण संदीप वॉरंटविषयी माहिती मिळाल्यानंतर काही काळासाठी कोणाच्याच संपर्कात नव्हता. त्याचा तपास लागत नसल्यामुळे नेपाळ पोलिसांनी संदीपचा शोध घेण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली. इंटरपोलने संदीपविरोधात ‘डिफ्यूजन’ नोटीस काढली होती. काही दिवसांनंतर संदीप काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला आणि पोलिंसांनी त्याला ताब्यात घेतले.
Sandeep Lamichhane has been given a punishment of 8 years in prison after being proven guilty. [ANI] pic.twitter.com/qqlcpnwFhV
— Johns. (@CricCrazyJohns) January 10, 2024
दरम्यन, संदीप लामिछाने याला जानेवारी 2024 मध्ये मोठा दिलासाही मिळाला होता. कारण 20 लाख रुपयांचा दंड भरल्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला होता. माहितीनुसार त्यानंतर संदीपने क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन देखील केले होते. तत्पूर्वी डिसेंबर महिन्यात अटक होण्याआदी संदीपने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते की, तो तपासातील सर्व पायऱ्यांवर पूर्ण सहकार्य करेल आणि आपण निर्दोश असल्याचे सिद्ध करेल. त्यावेळी त्याने सर्व आरोप खोटे आणि त्याला अडकण्यासाठी केले जात असल्याचे बोलले होते.
महत्वाच्या बातम्या –
IND vs AFG । ईशानला महागात पडली ‘ती’ पार्टी, निवडकर्ते ऍक्शन मोडमध्ये; अय्यरला वगळण्याचे कारणही समजलं
Rashid Khan । भारताविरुद्धच्या मालिकेतून राशिद खानची माघार, जाणून घ्या सरावाला सुरुवात केल्यानंतर का घेतला निर्णय?