---Advertisement---

MCA Election 2022: पवार-शेलार गटात रंगणार कलगीतुरा! संदीप पाटील पवार गटाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार

On: शनिवार, ऑक्टोबर 8, 2022 4:19 PM
---Advertisement---

देशातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) निवडणूक (MCA Election) जवळ येऊ लागली आहे. 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत दोन राजकीय गट आमने-सामने येत आहेत. विद्यमान अध्यक्ष व भाजप आमदार आशिष शेलार यांच्याविरुद्ध माजी अध्यक्ष शरद पवार यांचे गट निवडणुकीत नशीब आजमावणार आहे. शरद पवार गटातर्फे माजी भारतीय क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी नुकताच अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला.

ही त्रैवार्षिक निवडणूक 28 सप्टेंबर रोजी होणे अपेक्षित होते. मात्र, काही कारणास्तव ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता 20 ऑक्टोबर रोजी निवडणूक पार पडेल. या निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या मतदारांची यादी नुकतीच संघटनेकडून जाहीर करण्यात आली. आयसीसी अध्यक्षपद भूषवलेले शरद पवार हे आशिष शेलार यांच्या पायोनियर क्लबकडून मतदान करतील. संदीप पाटील यांनी आता अर्ज दाखल केल्याने यावर्षी संदीप पाटील विरुद्ध आशिष शेलार असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे.

पवार गटाकडून उपाध्यक्ष पदासाठी नवीन शेट्टी यांचे नाव घोषित केले गेले असून, बीसीसीआयचे माजी पदाधिकारी रत्नाकर शेट्टी हे मार्गदर्शक म्हणून पॅनलला सर्व प्रक्रिया समजावतील. पवार गटाकडून सचिवपदासाठी अजिंक्य नाईक, संयुक्त सचिवपदासाठी गौरव पय्याडे आणि कोषाध्यक्षपदासाठी जगदीश आचरेकर हे उमेदवार असतील. त्याशिवाय कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठीही पवार गटाकडून अभय हडप, कौशिक गोडबोले, प्रशांत सावंत, दाऊद पटेल, संदीप विचारे, विघ्नेश कदम, सुरेंद्र शेवाळे, सुरेंद्र हरमळकर आणि राजेंद्र महंत यांची नावे घोषित केली गेली आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

बिहारच्या सौरभ कुमारने 49 रुपयांचे केले 1 कोटी, हार्दिक पंड्याला संघात घेतल्यामुळे चमकले नशीब
ऐन वर्ल्डकपच्या तोंडावर कोचचा राजीनामा, दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलूचा कारनामा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---