सध्या भारतामध्ये शेतकरी आंदोलनाची चांगलीच चर्चा सुरू आहे. भारत सरकारने मागील वर्षी पास केलेल्या तीन कृषी विधेयकांना विरोध म्हणून शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलनाचा कालावधी वाढत असल्याने अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी देखील या आंदोलनाची दखल घेतली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय क्रिकेटपटूंनी ‘इंडिया टुगेदर’ हा ट्रेंड चालवला. त्यामुळे क्रिकेटपटू हे शेतकरी विरोधी असल्याचा समज झाला व अनेकांनी या विषयावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. त्याचवेळी आता, क्रिकेटपटू संदीप शर्माने केलेल्या ट्विटमुळे त्याचे कौतुक होत आहे.
भारतीय क्रिकेटपटूंनी चालवला ‘इंडिया टुगेदर’ ट्रेंड
बुधवारी रात्री (३ फेब्रुवारी) भारतीय क्रिकेट संघातील आजी-माजी खेळाडूंनी ‘इंडिया टुगेदर’ या हॅशटॅगसह अनेक ट्विट केली. या ट्विट्समुळे क्रिकेटपटू हे शेतकरी विरोधी आहेत असा अनेकांचा समज झाला. ज्यामुळे, त्यांना चाहत्यांच्या प्रचंड रोषास सामोरे जावे लागले. अनेकांनी त्यांना अनफॉलो करण्यास सुरुवात केली. ट्विट करणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, युवराज सिंग या माजी खेळाडूंसह विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, हार्दिक पंड्या या विद्यमान खेळाडूंचा समावेश होता.
संदीप शर्माने जिंकली मने
पंजाबचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याने मात्र अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले. इतर खेळाडूंनी आपल्या ट्विटमध्ये ‘देशाच्या अंतर्गत बाबीत बाहेरच्या इतरांनी ढवळाढवळ करू नये’ आशा आशयाने ट्विट केले होते. त्यावर संदीपने भूतकाळातील अनेक घटनांचा दाखला देत असलेले पत्रक प्रकाशित केले आणि त्यावर ट्विट लिहिले की, ‘या युक्तिवादानुसार कोणीही एकमेकांच्या परिस्थितीवर बोलू नये कारण प्रत्येक परिस्थिती ही एखाद्याची अंतर्गत बाब असते.’
चाहत्यांनी केले कौतुक संदीपचे ट्विट चाहत्यांकडून चांगलेच पसंत केले केले. त्यावर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने म्हटले, ‘तू शेतकऱ्यांचा खरा नायक आहेस’
Sandeep Sharma, the Real Hero for Farmers!#IndianFarmersHumanRights pic.twitter.com/zXSkJaFC3v
— Abdul Basit (@abdulbasit_tech) February 4, 2021
अन्य एकाने तर त्याला तो खेळत असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार बनवण्याची मागणी केली.
Sandeep Sharma should captain SRH for being able to take bold decisions.
— Heisenberg ☢ (@internetumpire) February 4, 2021
दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले आहे की, संदीप शर्मा हा सचिन तेंडुलकरपेक्षा उत्तम क्रिकेटपटू आहे.
https://twitter.com/AmitabhBachpan_/status/1357302066897555458
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे संदीप शर्मा
पंजाबकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणारा संदीप शर्मा देशांतर्गत क्रिकेटमधील मोठे नाव आहे. संदीपने भारताकडून १ आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला आहे. आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करतो.
अमेरिकन गायिकेने उचलला होता शेतकरी आंदोलनाचा मुद्दा
अमेरिकन पॉपस्टार रिहाना हिने मंगळवारी (२ फेब्रुवारी) रोजी जवळपास तीन महिने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्दाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींनी त्याला समर्थन दिले. आता त्याला उत्तर म्हणून भारतातील सेलिब्रिटींनी हा ट्रेंड केला. मात्र, लोकांची नाराजी पाहता याचा उलट परिणाम झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, भारतातील सेलिब्रिटींनी या आधी या मुद्द्यावर काहीही भाष्य केले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या –
चेपॉक स्टेडियमवर पहिल्यांदा इंग्लंडला कसोटीत धूळ चारणारा भारतीय धुरंधर, नाव आहे ‘पंकज रॉय’
Video : बिग बॅश लीगमध्ये तब्बल ३ वेळा करण्यात आला टॉस, कारण आहे फारच मजेशीर
सलग चौथ्या वर्षीही विराट देशातील सर्वात मोठा सेलिब्रिटी; तब्बल ‘एवढ्या’ कोटींची आहे ब्रँड व्हॅल्यू