---Advertisement---

सुट्टी नाही! लखनऊ पराभूत होताच मुंबईच्या खेळाडूंनी उडवली नवीनची खिल्ली, सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड

On: गुरूवार, मे 25, 2023 8:03 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने शानदार विजय मिळवला. लखनऊ सुपरजायंट्स आपल्या दुसऱ्या हंगामातही अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला नाही. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या लढतीत मुंबईने 81 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक याला खास इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत ट्रोल केले.

या निर्णायक सामन्यात नवीन याने लखनऊ साठी जबरदस्त कामगिरी करताना चार बळी मिळवले होते. मात्र फलंदाजांच्या हाराकिरीमुळे लखनऊ संघाला मोठा पराभव पहावा लागला. त्यानंतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू संदीप वॉरियर व विष्णू विनोद यांनी थेट त्याला लक्ष करत ट्रोल केले.

https://twitter.com/Akhil_SarthakFC/status/1661441428780896256?t=9sCJ9MCSu6FyBbtKN36RTg&s=19

या सामन्यात नवीन याने बळी मिळवल्यानंतर आगळेवेगळे सेलिब्रेशन केले होते. वॉरियर विनोद  व कुमार कार्तिकेय यांनी हेच सेलिब्रेशन कॉपी करताना समोर आंबे ठेवले होते. तसेच त्याला कॅप्शन देताना स्वीट सीजन मँगोज असे कॅप्शन दिले होते.

काही दिवसांपूर्वी झालेल्या आरसीबी विरुद्ध लखनऊ सामन्यात नवीन व विराट कोहली यांच्या दरम्यान वाद झाला होता. तेव्हापासून नवीन सातत्याने आरसीबीच्या सामन्यानंतर इंस्टाग्रामवर विविध गोष्टी पोस्ट करताना दिसला. एकदा विराट लवकर बाद झाल्यानंतर त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर आंबे गोड लागले अशा आशयाची पोस्ट केली होती. तसेच आरसीबी स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर त्याने विराट कोहलीला खिजवण्यासाठी मीम पोस्ट केलेले. तेव्हापासून प्रत्येक मैदानावर चाहते नवीन याला ट्रोल करताना दिसले. तसेच सोशल मीडियावर देखील तो सातत्याने लक्ष होत आहे.

(Sandeep Warrier And Vishnu Vinod Instagram Story For Trolling Naveen Ul Haq After Lucknow Supergiants Lost In Eliminator)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---