आयपीएल 2021 स्पर्धेदरम्यान कोरोनाचा पहिला विळखा कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू संदीप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती यांना बसला होता. हे दोन्ही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणखी काही खेळाडू पॉझिटिव्ह आढळले व यानंतर आयपीएल 2021 हंगाम स्थगित करण्यात आला. आता वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. नुकतेच वेगवान गोलंदाज वॉरियरने आपले अनुभव सांगितले आहेत.
वॉरियरने या कठीण प्रसंगी संघाचे मालक असलेले सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान यांनी त्यांना समर्थन कसे दिले या बद्दल माहिती दिली आहे. न्यूज 18 शी बोलताना संदीप वॉरियर म्हणाला की त्या कठीण काळात संपूर्ण टीम मॅनेजमेंटने त्याला पाठिंबा दर्शविला होता.
वॉरियर म्हणाला, ‘आमचे टीम डॉक्टर श्रीकांत आणि मॅनेजर वेन बेंटले माझ्यासाठी हॉटेलमध्येच थांबले होते. आम्ही आरटीपीसीआर चाचणीत निगेटिव्ह आलो तेव्हाच ते परत गेले.” वॉरियरने असा खुलासा केला की, संघाचा मालक शाहरुख खानने त्याच्या आणि वरुण चक्रवर्तीच्या प्रकृतीविषयीही बऱ्याचदा विचारना केली. या कठीण प्रसंगी शाहरुख खान त्याला एकटे सोडू इच्छित नसल्याचे वॉरियरने सांगितले आहे. कोणीतरी शेवटपर्यंत वॉरियर सोबत रहावे अशी शाहरुखची इच्छा होती.
संदीप वॉरियर म्हणाला, ‘जेव्हा आम्ही कोरोना पॉझिटिव्ह आढळलो तेव्हा आम्हाला संघापासून वेगळे करण्यात आले. यानंतर दुसर्याच दिवशी आयपीएल रद्द करण्यात आले. यानंतर आमची एक ऑनलाईन मीटिंग झाली, ज्यात प्रत्येकजण माझ्या आणि वरुणच्या प्रकृतीबद्दल विचारत होता. शाहरुख खानने सर्व खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांशीही संवाद साधला आणि त्यांना सुरक्षित घरी पाठवण्याचे आश्वासन दिले.”
वॉरियर पुढे म्हणाला, “शाहरुख खान माझ्यासाठी आणि वरुणसाठी खूपच काळजीत दिसत होते आणि त्यांनी सांगितले की कोणीतरी आमच्याबरोबर 10 दिवस असलेच.” दरम्यान कोलकाता संघाचे सिईओ वेंकी मैसूर खेळाडूंसोबत 3 दिवस अतिरिक्त थांबले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
चुकीला माफी नाही! १८ वर्षीय नसीम शाहला नडली मोठी चूक; ‘या’ मोठी स्पर्धेतून काढले बाहेर
श्रीलंकेविरुद्ध शतक झळकवत मुशफिकुर रहीमचा खास पराक्रम, दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
स्टीव्ह स्मिथ आता बनणार नाही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार? दिग्गज क्रिकेटपटूने दिले ‘हे’ उत्तर