---Advertisement---

सांगली सिंध सोनिक्स संघाची विजयासह सांगता

On: गुरूवार, एप्रिल 20, 2023 12:31 AM
Kabaddi
---Advertisement---

रेलीगेशन फेरीतील सामन्याचा आज शेवटचा दिवस होता. धुळे चोला वीरांस विरुद्ध सांगली सिंध सोनिक्स यांच्यात लढत झाली. दोन्ही संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. त्यामुळे सामना औपचारिकता होती. सांगली संघाकडून आक्रमक खेळ सुरू करत धुळे संघावर लोन पाडला.

सांगली कडे 17-8 अशी आघाडी असताना धुलेच्या मितेश कदम ने 6 गुणांची सुपर डुपर रेड करत सामना फिरवला. सांगलीच्या शेवटच्या खेळाडूंची पकड करत धुळे संघाने सांगलीला ऑल आऊट केले. 18-17 अशी पिझाडी कमी केली. मध्यंतराला 25-23 अशी सांगली कडे आघाडी होती. सांगली कडून वृषभ साळुंखे तर धुळे कडून मितेश कदम उत्कृष्ट चढाया करत संघाला गुण मिळवून देत होते.

शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना सांगली कडे 38-35 अशी आघाडी होती. त्यानंतर मितेश कदमची झालेली पकड सांगली साठी महत्वपूर्ण ठरली. सांगली आपली आघाडी कायम ठेवत 44-40 असा सामना जिंकत आपला स्पर्धेतील शेवट गोड केला. सांगली कडून वृषभ साळुंखे ने 19 गुण मिळवले. तर प्रणव माने ने 7 उत्कृष्ट पकडी केल्या. धुळे कडून मितेश कदम ने 20 गुण मिळवत प्राप्त केले. (Sangli Sindh Sonics finish with a win)

बेस्ट रेडर- मितेश कदम, धुळे चोला वीरांस
बेस्ट डिफेंडर्स- प्रणव माने, सांगली सिंध सोनिक्स
कबड्डी का कमाल- मितेश कदम, धुळे चोला वीरांस

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! दोन महिन्यांपूर्वीच पदार्पण केलेल्या खेळाडूची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती, ठोकलेले एकमेव सामन्यात शतक
‘राहुलला टी20 मध्ये बॅटिंग करताना पाहणे बोरिंग’, लाईव्ह कॉमेंट्रीमध्ये दिग्गजाची टीका 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---