पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज दुपारी एलिमिनेटर 3 चा सामना झाला. काळ क्वालिफायर 1 मध्ये पराभूत सांगली संघ विरुद्ध एलिमिनेटर 1 मध्ये विजयी मुंबई शहर संघ यांच्यात हा सामना झाला. सामन्याचा पहिला गुण सांगलीच्या अभिषेक गुंगे ने पटकावला. सांगलीच्या नवाज देसाई व प्रसन्न पाटील यांनी मुंबई शहरच्या चढाईपटूंची पकड करत गुण मिळवले. सांगलीच्या बचावपटूंनी उत्कृष्ट पकडी करत मुंबई शहराला ऑल आऊट करत 9-1 अशी आघाडी मिळवली.
सांगली कडून सांघिक खेळ बघायला मिळाला. तर मुंबई शहर कडून जतिन विंदे ने चढाईत गुण मिळवत संघाची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सांगलीच्या बचवाफळी ने मुंबई शहरच्या चढाईपटूंना बाद करत गुण मिळवले. मध्यंतराला सांगली संघाकडे 20-11 अशी आघाडी मिळवली. सांगलीच्या अशपक अत्तर ने हाय फाय पूर्ण करत बचावफळीत महत्वपूर्ण भूमिका निभावली. अभिषेक गुंगेची चढाईत गुण मिळवले. मुंबई शहर कडून तुषार शिंदे व जतिन विंदे ने चढाईत गुण मिळवले.
सांगलीने मध्यंतरा नंतर 5 व्या मिनिटाला मुंबई शहर ला ऑल आऊट करत सांगली संघाने 27-14 अशी आघाडी-मिळवली. सांगलीने 48-26 असा एकतर्फी विजय मिळवत सेमी फायनल क्वालिफायर प्रवेश मिळवला. सांगली कडून अभिषेक गुंगे ने चढाईत 9 तर अभिराज पवार ने चढाईत 7 गुण मिळवले. शुभम पाटील ने अष्टपैलू खेळ करत चढाईत 5 तर पकडीत 3 गुण मिळवले. अशपाक अत्तर ने पकडीत 6 गुण मिळवले. मुंबई शहर कडून जतिन विंदे ने चढाईत 8 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- अभिषेक गुंगे, सांगली
बेस्ट डिफेंडर- अशपक अत्तर, सांगली
कबड्डी का कमाल – अशपक अत्तर, सांगली