क्रिकेटविश्वात भारत-पाकिस्तान संघाचे सामने किती रोमांचक होतात हे सर्वांनाच परिचीत आहे. त्यातच दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्येही सामन्याच्यावेळी एक वेगळेच वैर दिसून येते, त्याला काही अपवाद ठरले आहेत. या दोन्ही देशांच्या दोन व्यक्तिंमध्ये प्रेमाचे अंकुर फुलले आणि आता त्यांचे नात धोक्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याने भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिच्याशी विवाह केला. आता दोघांमध्ये काहीतरी बिनसले याची माहिती समोर येत आहे.
झाले असे की, सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने तिच्या इंस्टा स्टोरीमध्ये असे काही लिहिले ज्यामुळे चाहत्यांमध्ये भ्रम निर्माण झाला. तिच्या विचित्र स्टोरीने चाहत्यांनी तिचे आणि शोएब मलिक (Shoaib Malik) यांचा काडीमोड होणार की काय अशी शंका व्यक्त केली आहे.
दोघांच्या लग्नाला आता 10 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. तर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या वार्ता पुढे येत आहेत. सानियाने एक क्रिप्टिक इंस्टा स्टोरी शेयर केली. जी आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये तिने उर्दुमध्ये लिहिले होते त्याचा अर्थ, ‘टुटे दिल कहां जाते है? अल्लाह को खोजने के लिये|’, यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
ते दोघेही मुलगा इजहान ला को-पॅरेटिंग देत आहेत, अशा अफवा पसरत आहेत. तरीही त्याबाबत दोघांकडूनही काही अधिकृत विधान पुढे आलेले नाही. दोघांनी 2010च्या एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली होती. आता त्या दोघांना एक चार वर्षाचा मुलगादेखील आहे. दोघांनी मुलाचा वाढदिवस दुबईमध्ये सेलेब्रेट केला, मात्र फोटो केवळ शोएबनेच शेयर केले. तसेच काही दिवसांपूर्वी सानियाने मुलासोबत एक पोस्ट शेयर केली होती, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ‘वो पल मुझे सबसे कठीण दिनों से निकालते हैं|’
या दोघांमध्ये नक्की काय झाले हे अद्यापही समोर आलेले नाही, मात्र लवकरच त्यांचा घटस्पोट होणार हा चर्चांना उधान आले आहे. पाकिस्तानी मीडियाने तर या दोघांनी केव्हाच वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून मागील काही काळापासून विभक्तच राहत आहे, असे सांगितले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराट-रोहितला इतिहास रचण्याची संधी, दोन्ही संघ 35 वर्षांनंतर उपांत्य फेरीत भिडणार
मोठी घोषणा! दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये टी20 लीगची सुरुवात, आयपीएलच्या 6 फ्रँचायझींनी उतरवले आपले संघ