भारतीय महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक लवकरच पालक होणार आहेत.
या विषयी त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. सानिया आणि शोएब या दोघांनीही त्यांच्या ट्विटर अकांउटवर एक फोटो शेयर केला आहे आणि त्याला त्यांनी ‘बेबी मिर्झामलिक’ असे कॅप्शन दिले आहे.
#BabyMirzaMalik 👶🏽❤️ pic.twitter.com/RTYpqok1Vl
— Sania Mirza (@MirzaSania) April 23, 2018
#MirzaMalik ❤️ 👶🏼 pic.twitter.com/8MKmA4CvR3
— Shoaib Malik 🇵🇰 (@realshoaibmalik) April 23, 2018
काही दिवसांपूर्वीच ‘गोवा फेस्ट 2018’ या कार्यक्रमात झालेल्या ‘ लैंगिक भेदभाव’ विषयावरील पॅनेल चर्चेत बोलताना सानियाने सांगितले होते की तिला आणि शोएबला मुलगी हवी आहे. तसेच तिने असेही सांगितले होते की तिला आणि शोएबला जे मुल होईल त्याचे अडनाव मिर्झा-मलिक असेल.
सानियाने ऑक्टोबरपासून गुढगा दुखापतीमुळे टेनिसपासून लांब आहे. यामुळे तिला दुहेरीमधील तिचे अव्वल स्थानही गमवावे लागले आहे.
सानिया 2005 मध्ये डब्ल्यूटीए स्पर्धेतील एकेरीचे विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय ठरली होती. पण नंतर मनगटाच्या दुखापतीमुळे तिने एकेरीत खेळणे बंद करून दुहेरीवर लक्ष केंद्रित केले होते.
तिने आत्तापर्यंत डब्ल्यूटीएची 41 विजेतेपदे मिळवली आहेत. तसेच शोएब हा पाकिस्तानचा माजी कर्णधार असुन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाकिस्तानच्या विजयी संघात त्याचा समावेश होता.