भारताची स्टार टेनिसपटू आणि माजी जागतिक दुहेरीतील पहिल्या क्रमांकाची खेळाडू सानिया मिर्झा (Sania Mirza) ही निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होत्या. त्याला आता विरामचिन्ह सानियानेच लावले असून तिने निवृत्ती कधी घेणार हे पण सांगितले आहे. ती 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या डब्ल्यूटीए 1000 दुबई टेनिस चॅम्पियनशीपनंतर निवृत्त होणार आहे.
मागील हंगामातच 36 वर्षीय सानिया निवृत्ती घेणार होती, मात्र दुखापतीमुळे तिला जवळपास 6 महिने कोणत्याच स्पर्धेत खेळता आले नाही. 2023च्या फेब्रुवारी महिन्यात ती कारकिर्दीचा शेवटच करणार असल्याचे जाहीर होताच चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले. तिने भारतासाठी 6 ग्रॅंड स्लॅम जिंकले.
सानियाने डब्ल्यूटीए टेनिस डॉट कॉमशी बोलताना म्हणाली, “मी 2022च्या अखेरच निवृत्ती घेणार होते, मात्र यूएस ओपनच्या आधी मला हाताच्या कोपराची दुखापत झाली. त्यामुळे मी स्पर्धेतून माघार घेतली.”
“माझ्यामते, आता खरी वेळ आहे निवृत्त होण्याची. दुखापत होऊ नये याची मी काळजी घेत आहे. दुबईत होणाऱ्या टेनिस चॅम्पियनशीपमध्ये कारकिर्दीचा शेवटचा सामना खेळण्याची योजना आहे,” असेही सानियाने पुढे म्हटले.
सानियाने 2010मध्ये पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक (Shaoib Malik) याच्याशी लग्न केले. या दोघांना 4 वर्षाचा मुलगा असून तिने नुकतेच दुबईमध्ये टेनिस अकॅडमी खोलली आहे. ती मागील एक दशकापासून दुबईमध्ये स्थायिक आहे.
“आम्हाला टेनिसचा प्रचार करायचा आहे. युएईमध्ये पैसे आहेत, मात्र तरीही तेथे टेनिस खेळाडूंची कमतरता आहे,” असे सानियाने दुबईमध्ये टेनिस अकॅडमी उघडण्यामागचे कारण सांगितले.
तसेच सानियाने 2013मध्ये हैद्राबादमध्येही टेनिस अकॅडमी उघडली आहे. तिने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत ऑस्ट्रेलियन ओपन (2016), विम्बल्डन (2015) आणि यूएस ओपनच्या (2015) महिला दुहेरीत विजेतेपद पटकावले. तसेच मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपन (2009), फ्रेंच ओपन (2012) आणि यूएस ओपन (2014) हे विजेतेपद पटकावली आहेत. ती 2015मध्ये दुहेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ओडिशा एफसीला प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची संधी; ईस्ट बंगालशी सामना
बंड्या मारुती सेवा मंडळ स्थानिक पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2023