भारताची दिग्गज महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने यूएस ओपन २०२२ मधून आपले नाव मागे घेतले आहे. कोपराच्या दुखापतीमुळे तिला हा निर्णय घ्यावा लागला. सानिया मिर्झाला दोन आठवड्यांपूर्वी ही दुखापत झाली होती, ज्यातून ती सावरू शकलेली नाही. तिने मंगळवारी (२३ ऑगस्ट) इंस्टाग्राम स्टोरीद्वारे तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली.
सानियाने लिहिले की, ‘एक वाईट बातमी आहे. दोन आठवड्यांपूर्वी कॅनडामध्ये खेळताना माझ्या कोपराला दुखापत झाली होती. ते किती खोलवर जाऊ शकते याची मला कल्पना नव्हती. मला काल माझ्या दुखापतीचे स्कॅन मिळाले. दुर्दैवाने, मी माझे टेंडन (हाडे आणि स्नायू यांना जोडणारी ऊती) थोडी फाटली आहेत. मला आठवडाभर कोर्टपासून दूर राहावे लागेल. मी यूएस ओपनमधून माघार घेतली आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिलच्या शतकानंतर युवी आणि पंतमध्ये ट्विटरवर रंगली शाब्दिक फटकेबाजी
आशिया चषकात ‘हा’ गोलंदाज ठरणार पाकिस्तानी संघाचा तारणहार! संघाच्या प्रशिक्षकाने केलाय दावा