भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू संजय बांगर रिषभ पंतच्या फलंदाजीच्या संघर्षाबद्दल मत व्यक्त केले. त्याने या यष्टीरक्षकाची तुलना सचिन तेंडुलकरच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुरुवातीच्या दिवसांशी केली. सचिन तेंडुलकरला त्याचे एकदिवसीय शतक झळकावण्यासाठी ७० हून अधिक एकदिवसीय सामने लागल्याचे त्याने नमूद केले.
बांगर म्हणाला की, “इशान किशन वरच्या फळीत चांगली कामगिरी करत असला तरी पंत या स्थानावर खेळू शकतो. भारतीय संघ यावेळी सलामीच्या डावखुऱ्या-उजव्या जोडीचा शोध घेत असेल, तर पंत हा डाव्या हाताच्या फलंदाजाचा दीर्घकाळ पर्याय असू शकतो.”
भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक म्हणाले की, “मी तीन वर्षांपासून याचा विचार करत आहे. सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याचे पहिले एकदिवसीय शतक ७५व्या किंवा ७६व्या डावात झाले. जेव्हा त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात डावाची सुरुवात करण्यास सांगण्यात आले. यापूर्वी त्याची कारकीर्द मधल्या फळीत होती.”
‘रिषभ पंत होऊ शकतो भारताचा गिलख्रिस्ट’
बांगर म्हणाले की, “सध्या भारतीय संघ डावे-उजवे संयोजन पाहत आहे. होय, इशान किशन सध्या चांगली कामगिरी करत आहे पण जर भारतीय संघ या संयोजनाचा दीर्घकाळ विचार करत असेल, तर ऋषभ पंत भारतासाठी तेच करू शकतो जो ऍडम गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलियासाठी केला होता.”
टीम इंडियाचा आणखी एक माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनेही पंतला बॅटिंग ऑर्डरमध्ये वर पाठवण्याबाबत मत व्यक्त केले. तो म्हणाला की, “डावाच्या सुरुवातीला चेंडू स्विंग करण्याचे आव्हान असले तरी पंत हा एक दर्जेदार फलंदाज आहे जो तो हाताळू शकतो. पंतला भविष्यात ही जबाबदारी मिळू शकते, असे पठाणला वाटते, परंतु ते लगेच होणार नाही असा विश्वास वाटतो.”
दरम्यान, दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या टी२० मालिकेतून रोहित शर्माला विश्रांती आणि केएल राहुलला मालिकेपूर्वी दुखापत झाल्याने रिषभ पंतवर कर्णधार पदाची जबाबदारी आली होती. कर्णधार म्हणून पहिले दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर तिसऱ्या आमि चौथ्या सामन्यात त्याने चांगले नेतृत्व केले. मात्र, त्याला संपूर्ण मालिकेत फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. त्यामुळए पंतला टी२० विश्वचषकात संघात स्थान मिळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रणजी चषकाच्या अंतिम सामन्यात आचरेकरांचे ‘हे’ दोन शिष्य भिडणार!
‘आम्ही मालिका जिंकण्यासाठी उत्सुक’, राहुल द्रविडने व्यक्त केली भावना
‘तो अजून शिकत आहे’, भारताच्या माजी दिग्गजाने केली पंतची पाठराखण