---Advertisement---

सचिनचा संघसहकारी म्हणतोय, “विराटला तिथपर्यंत जायला मोठा पहाड फोडायचाय”

On: शुक्रवार, जानेवारी 13, 2023 7:11 PM
Sachin Tendulkar and Virat Kohli
---Advertisement---

सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जातेय. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने विजय आघाडी घेतली आहे.‌ गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील 45 वे शतक पूर्ण केले.‌ या शतकानंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचवेळी अनेक जण सचिन तेंडुलकर याच्याशी त्याची तुलना देखील करत आहेत. मात्र, त्याचवेळी एकेकाळी सचिनचे संघ सहकारी राहिलेल्या संजय मांजरेकर यांनी या दोघांच्या तुलनेबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

विराट कोहली याने या वर्षातील आपला पहिला सामना खेळताना आपली जुनी झलक दाखवून दिले. श्रीलंकन गोलंदाजांवर एकहाती वर्चस्व गाजवताना त्याने, आपले 73 वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. विराटने या सामन्यात केवळ 87 चेंडूंचा सामना करताना 113 धावांची अफलातून खेळी केली. यामध्ये 11 चौकार व एका षटकाराचा समावेश होता.

त्याच्या या शतकानंतर मांजरेकर यांनी प्रसारण वाहिनीशी बोलताना म्हटले,

“विराट वनडे क्रिकेटचा सर्वकालीन महान खेळाडू आहे यात वादच नाही. लवकरचतो सचिनच्या 49 वन डे शतकांचा विक्रम मोडीत काढेल. मात्र, त्याच्यापुढील सर्वात मोठे आव्हान असेल ते 51 कसोटी शतकांचा विक्रम तोडण्याचे. यासाठी त्याला अजून मोठा पहाड फोडायचा आहे. विराटही तिथपर्यंत पोहोचू शकतो मात्र त्यासाठी त्याला‌ कसोटी क्रिकेटमध्ये आणखी आणखी दर्जा दाखवावा लागेल.”

सचिनने आपल्या कसोटी कारकीर्दीत 200 सामने खेळताना 51 शतके झळकावली होती. तर, विराटने आत्तापर्यंत 104 कसोटी सामने खेळले असून,‌‌ यात 29 शतकांचा समावेश आहे. विराटने आपले अखेरचे कसोटी शतक 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध झळकावले होते.

(Sanjay Manjarekar Talk About Sachin And Virat Comparison)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तो आला, त्याने मॅच जिंकून दिली; तरीही ड्रेसिंग रूममध्ये का खावा लागला ओरडा?, कुलदीपचा मोठा खुलासा
रोहितने दिली संधी, पण कुलदीपने भलत्याच खेळाडूचे गायले गुणगान; म्हणाला, ‘त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---