आयपीएलच्या १३व्या हंगामाच्या सुरुवातीला पृथ्वी शॉने गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. मात्र पुढे दिल्ली कॅपिटल्सच्या या सलामीवीर फलंदाजाचा फॉर्म बिघडला. त्यामुळे मागील २ सामन्यांत त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी पृथ्वी शॉला फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे.
संजय मांजरेकरांचा सल्ला
मांजरेकरांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर लिहिले की, “तू अवघड वाटणारे शॉट खेळू नकोस. कारण अशावेळी चेंडूला हिट करणे कठीण जाते. तू विरेंद्र सेहवागचा आदर्श डोळ्यापुढे ठेव आणि त्याच्या फलंदाजीचे लक्ष देऊन निरीक्षण कर. तो फक्त तेच चेंडू खेळतो, ज्यांवर तो आत्मविश्वासाने षटकेबाजी करु शकतो.”
पृथ्वी शॉची आकडेवारी
२० वर्षीय धुरंधर पृथ्वी शॉचे आयपीएलच्या तेराव्या हंगामातील प्रदर्शन जास्त विशेष राहिलेले नाही. त्याने आतापर्यंत हंगामातील ११ सामने खेळले असून २१९ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने २ अर्धशतके लगावली आहेत, तर २ वेळा तो शून्य धावेवर मैदानाबाहेर गेला आहे. या तुलनेत गेल्या २ हंगामातील त्याचे प्रदर्शन प्रशंसनीय राहिले आहे.
शॉने २०१८ साली केवळ ९ सामन्यात २७.२२च्या सरासरीने २४५ धावा केल्या होत्या. तर गतवर्षी १६ सामन्यात २२.०६च्या सरासरीने त्याने ३५३ धावा खात्यात जमा केल्या होत्या.
https://twitter.com/sanjaymanjrekar/status/1322736485074759680?s=20
दिल्ली कॅपिटल्सवर ‘करा वा मरा’ स्थिती
पृथ्वी शॉ प्रतिनिधित्त्व करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचे मागील काही सामन्यातील प्रदर्शन बिघडले आहे. त्यांना मागील सलग ४ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे गुणतालिकेत १४ गुणांसह दूसऱ्या स्थानावर विराजमान असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरद्ध त्यांचा ‘करा वा मरा’ सामना होणार आहे. सोमवारी (२ नोव्हेंबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर हा सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
“त्याच्यापेक्षा ‘हा’ खेळाडू जास्त लायक,” टी-२०तील जडेजाच्या निवडीवर माजी क्रिकेटरचे वादग्रस्त विधान
मार्केट पडल्यावर ऋतुराज गायकवाडचा ट्रकभर कांदा मार्केटमध्ये, सीएसकेच्या विजयानंतर मीम्सचा पाऊस
‘ही’ प्रसिद्ध कंपनी बनली महिला आयपीएलची टायटल स्पॉन्सर, बीसीसीआयने केली घोषणा
ट्रेंडिंग लेख-
सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ
एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’
ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण