आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना रविवारी (१९ सप्टेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याआधी दोन्ही संघ चांगले प्रदर्शन करण्यासाठी सराव करत आहेत. अशातच भारताचे माजी दिग्गज सलामीवीर फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी पहिल्या सामन्यावषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजी क्रमात एक मोठा बदल करण्याचा सल्ला संघाला दिला आहे.
रवींद्र जडेजाला धोनीच्या आधी फलंदाजीला येण्याचा दिला सल्ला
पहिल्या सामन्याआधी संजय मांजरेकरांनी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आधी रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी मैदानात उतरवण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “जडेजाने आजच्या सामन्यात धोनीच्या आधी फलंदाजी केली पाहिजे. मला वाटते यामुळे सीएसकेचे प्रदर्शन आणखी चांगले होऊ शकते. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी चेन्नईच्या एप्रोचमध्ये खूप अंतर आहे. मोईन अली आणि सॅम करन यांनी आज प्रभावी खेळाडूंच्या रूपात संघात आपले स्थान निर्माण केले आहे. मला वाटते की यावर्षी चेन्नईचा संघ मागच्या वर्षीपेक्षा चांगले प्रदर्शन करेल.”
संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या खेळाडूंचा समावेश करण्याचा सल्ला
मांजरेकरांच्या मते सीएसकेने आजच्या सामन्यामध्ये त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेडलवुड याला संधी दिली पाहिजे. ते पुढे बोलताना म्हणाले की, “मोईन अलीसह त्यांनी त्यांचे दोन्ही वेगवान गोलंदाज जाोश हेजलवुड आणि दक्षिण अफ्रिकेचा लुंगी एन्गिडी याला संघात सामील केले पाहिजे.” तसेच खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असेल तर इमरान ताहिरचा पर्याय सुचवला आहे. ते म्हणाले, “जर खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी मदतगार असेल तर संघाने इमरान ताहिरलाही या सामन्यात संधी दिली पाहिजे.”
महत्त्वाच्या बातम्या-
यंदाची आयपीएल ट्रॉफी ‘या’ संघाचीच; मुंबई-चेन्नईतील महामुकाबल्याआधी ‘विरू बाबां’ची भविष्यवाणी
मुंबई-चेन्नई सामन्यादरम्यान कसे असेल हवामान, कोणाला होऊ शकतो फायदा; घ्या जाणून