मुंबई । भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर अनेकदा कमेंट्री बॉक्समध्ये आपल्या सहकाऱ्यांबरोबर विनोद करताना दिसतात. तथापि, बर्याच वेळा ते असे मत व्यक्त करतात, ज्यामुळे त्यांना त्याची चांगलीच किंमत मोजावी लागली. समालोचन करताना परखडपणे मत मांडल्याने भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने त्यांना कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकले.
सोशल मीडियावर देखील संजय मांजरेकर बिनधास्तपणे आपली मते व्यक्त करतात. ज्यामुळे त्यांना अनेकदा टीकेला देखील सामोरे जावे लागते. नुकतेच त्यांनी एका टेक्निशियनची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पीपीई कीट परिधान केलेल्या एका टेक्निशियनचा फोटो शेअर केला.
फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले की,” नासामधून एक माणूस माझ्याकडे वायफाय कनेक्शन देण्यासाठी आला आहे.” भारतीय महिला संघाच्या कर्णधार मिताली राज यांनीही या पोस्टवर भाष्य केले आहे, परंतु तिने ही विनोद म्हणून घेतले आहे. तथापि, मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने झाला असल्याने याच्यावर विनोद करू नये असे तिने सांगितले.
Person from NASA has come to fix my WiFi. pic.twitter.com/KKg51Jk2tI
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) July 19, 2020
1990 च्या दशकात भारतीय संघातील फलंदाजांपैकी एक असलेल्या संजय मांजरेकर यांनी फारसा विचार न करता ही पोस्ट केली आहे.
Ha ha !
— Mithali Raj (@M_Raj03) July 20, 2020
मुंबईत कोरोना विषाणूचा साथीचा रोग पसरत आहे. वायफाय आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी दुरुस्त करण्यासाठी दररोज घरोघरी तसेच कार्यालयात जातात. त्यामुळे सुरक्षेसाठी एपीपी कीट घातले होते. त्यांच्यासाठी असे शब्द वापरणे योग्य नव्हे. पण मांजरेकर यांना याचे काहीच महत्त्व वाटत नाही.