---Advertisement---

दिग्गजाने ‘फ्रि हीट’ हटवण्याचे सुचवताच, आर अश्विनने केली ‘फ्रि बॉल’ची मागणी

On: शुक्रवार, मे 28, 2021 10:37 PM
---Advertisement---

क्रिकेटचा खेळ हा फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील स्पर्धात्मक असला, तरी बहुतांश वेळी क्रिकेट हे फलंदाजांच्या बाजूने जास्त झुकलेले असल्याचे मानले जाते. माजी भारतीय फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनीही नुकतेच असेच मत दिले आहे. मांजरेकर यांनी यादरम्यान क्रिकेटमधून फ्री हिटचा नियम काढून टाकला पाहिजे असे मोठे विधान केले आहे.

मांजरेकर यांनी हिंदुस्तान टाईम्समधील आपल्या कॉलममध्ये लिहिले की, “फ्री हिट ही आणखी एक बाब आहे जी माझ्यामते काढून टाकली पाहिजे, कारण ही बाब गोलंदाजांवर अन्यायकारक आहे. आजकाल जेव्हा टीव्ही अंपायर नो बॉलवर नजर ठेवून आहेत, तेव्हा रेषेपासून फक्त काही सेंटीमीटर जरी चूक झाली तरी गोलंदाजाला कडक शिक्षा केली जाते. ”

मांजरेकर यांनी पुढे लिहिले की, “पहिली बाब म्हणजे गोलंदाजाला एक जास्तीचा चेंडू टाकावा लागतो व फलंदाज त्या मूळ चेंडूवर बाद होऊ शकत नाही. याव्यतिरिक्त, पुढच्या चेंडूवर फलंदाजास मोठा फटका मारण्याची एकप्रकारे ऑफर दिली जाते. त्या चेंडूवरही तो बाद होऊ शकत नाही. जणू काही गोलंदाजांचा द्वेष करणाऱ्याने हा नियम लागू केला आहे.”

मांजरेकर यांच्या कॉलमला उत्तर देताना भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ट्विट केले की, “जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज नॉन-स्ट्रायकरवर असताना लवकर रेषेच्या पुढे येईल, तेव्हा गोलंदाजांना एक फ्री चेंडू देण्यात यावा. त्या चेंडूवर विकेट मिळवल्यास गोलंदाजांच्या खात्यातील व एकूण धावसंख्येतील 10 धावा कमी करण्यात याव्या.”

दरम्यान हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, अश्विनने आयपीएल 2019 स्पर्धेदरम्यान राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू जोस बटलर याला मंकडिंग करून बाद केले होते. अश्विनवर तेव्हा काही प्रमाणात टीकाही करण्यात आली होती. मात्र त्याने कायमच आपल्या या कृत्याचे समर्थन केले असून तो वेगवेगळ्या माध्यमांतून कायमच मंकडिंगचे समर्थन करत आलेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सुशील पुरता फसला! निर्दयीपणे केली होती सागरला मारहाण, व्हिडिओ आला समोर

आठ आंतरराष्ट्रीय संघाचे सर्वाधिक कमाई करणारे कोण आहे क्रिकेटपटू, घ्या जाणून

एका चेंडूत ६ धावा हव्या असताना धोनीला कुठे गोलंदाजी करशील? पॅट कमिन्सने दिले ‘हे’ उत्तर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---