विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर अनेक दिग्गज खेळाडू भारतीय संघातील खेळाडूंवर टीका करताना दिसून येत आहेत. अशातच माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकर यांनी रवींद्र जडेजावर टीका केली आहे.
भारतीय संघाचे माजी फलंदाज संजय मांजरेकर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा ते खेळाडूंवर टीका करताना दिसून आले आहेत. यात बहुतांश वेळेस त्यांनी रवींद्र जडेजाबद्दल भाष्य केले आहे. रवींद्र जडेजा सध्या कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु त्याला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे संजय मांजरेकर यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. (Sanjay Manjrekar targated Ravindra Jadeja said, they picked for his batting and that backfired in WTC final)
संजय मांजरेकर यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोच्या एका कार्यक्रमात म्हटले की, “संघात दोन फिरकीपटूंना स्थान देणे हा चर्चेचा विषय होता. मुख्यतः जेव्हा पाऊस पडला होता आणि नाणेफेक करण्यात एक दिवस उशीर झाला होता. त्यावेळी एक अतिरिक्त फलंदाज म्हणून त्यांनी जडेजाला संधी दिली होती .तो डाव्या हाताचा गोलंदाज आहे म्हणून त्याला संधी दिली गेली नव्हती. तर तो फलंदाजी करेल म्हणून संघात संधी दिली गेली होती. मी नेहमीच या गोष्टीच्या विरुद्ध आहे. ”
संजय मांजरेकर यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघाने अतिरिक्त फलंदाज खेळवला असता तर आणखी बरे झाले असते. त्यांनी म्हटले की, “तुम्हाला संघात तज्ञ खेळाडूंची निवड करावी लागेल. जर तुम्हाला वाटत असेल की, खेळपट्टी कोरडी आहे आणि चेंडू फिरू शकतो, तर तुम्ही अश्विनसह डाव्या हाताचा फिरकी गोलंदाजी म्हणून जडेजाला स्थान दिले असते. तर ते समजू शकले असते. परंतु त्यांनी त्याला फलंदाज म्हणून निवडले आणि त्यांचा निर्णय फसला. जडेजाबाबतील बहुतेकदा असेच झाले आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “जर तुमच्या संघात हनुमा विहारीसारखा फलंदाज असता, ज्याचा डिफेन्स खूप तगडा आहे. तर हे आणखी सोपे झाले असते. कदाचित संघाच्या धावा १७०, २२०, २२५ किंवा २३० देखील होऊ शकल्या असत्या.”
महत्वाच्या बातम्या-
पराभवाचं दु:ख विसरुन भारतीय क्रिकेटर जाणार सुट्टीवर, विम्बल्डन-युरो चषकाचा घेतील आनंद!
WTC फायनल पराभवातून भारताला मिळाला धडा, कसोटी मालिकेपुर्वी ईसीबीला केली ‘ही’ विनंती