---Advertisement---

संजू सॅमसनबद्दलचे ‘ते’ ट्विट मांजरेकरांच्या अंगाशी; सोशल मीडियावर टीकेचा भडीमार

On: बुधवार, ऑक्टोबर 7, 2020 5:40 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या राजस्थान रॉयल्स संघातील फलंदाज संजू सॅमसन हा यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएल २०२०च्या आपल्या पहिल्याच सामन्यात ७४ धावांची दमदार खेळी करत हंगामाची दणक्यात सुरुवात केली होती. त्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने ८५ धावा ठोकल्या.

पण पुढील काही सामन्यात सॅमसनला १० आकडी धावसंख्यादेखील पार करता आली नाही. फॉर्ममध्ये बिघाड होणे ही सॅमसनसाठी नवी गोष्ट नाही. यापूर्वीच्या २ हंगामातही त्याने सुरुवातीच्या काही सामन्यात जोरदार धावा केल्या. मात्र त्यानंतर हंगामातील उर्वरित सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.

पण राजस्थानचा विस्फोटक फलंदाज सॅमसन त्याच्या फलंदाजीत सुधार करत पुन्हा मोठ्या आकडी धावा करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात तो शून्य धावेवर बाद होत तंबूत परतला.

त्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू संयज मांजरेकर यांनी ट्विट करत करत लिहिले की, “क्रिकेटचे स्वरुप कोणतेही असो, पण नेहमी फलंदाजाच्या प्रथम श्रेणी सरासरीवरुन त्याच्यातील प्रतिभेला पारखले पाहिजे. सॅमसनची प्रथम श्रेणी फलंदाजी सरासरी ३७ इतकी आहे, तर मयंक अगरवालची ५७ आणि शुबमन गिलची २१ सामन्यातील फलंदाजी सरासरी ७३ इतकी आहे.”

मांजरेकरच्या या ट्विटचे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपचू डेमियन मार्टिन यांनी समर्थन केले आणि एकदम बरोबर मुद्दा असल्याचे म्हटले.

मात्र बऱ्याच चाहत्यांना मांजरेकरांचे हे ट्विट आवडले नाही आणि त्यांनी त्या ट्विटवर टीका करायला सुरुवात केली. एका चाहत्याने ट्विट करत लिहिले की, “मार्नस लॅब्यूशानेची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील फलंदाजी सरासरी फक्त ३३ इतकी होती. तरी त्याची ऑस्ट्रेलिया संघात निवड करण्यात आली होती. एवढेच नाही, तर केवळ ६ महिन्यांच्या आत त्याला स्टिव्ह स्मिथचा उत्तराधिकारीदेखील म्हटले जाऊ लागले.”

https://twitter.com/sanjaymanjrekar/status/1313521106146324481?s=20

https://twitter.com/amitchakravarty/status/1313587017238765568?s=20

https://twitter.com/amitchakravarty/status/1313587534971113473?s=20

https://twitter.com/the_vaibhendra/status/1313576183817146368?s=20

https://twitter.com/sanjaymanjrekar/status/155134017002418177?s=20

“जर खेळाडूची निवड फक्त आकड्यांद्वारे होणार असेल, तर कोणही निवडकर्ता बनू शकतो. खेळाडूतील प्रतिभेचा शोध घेण्यासाठी खास नजर असावी लागते. मला वाटते की, युवराज सिंगदेखील याचे उदाहरण आहे, पण सौरव गांगुलीने त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते,” असे त्या चाहत्याने पुढे लिहिले. पुढे हा वाद अजून वाढत गेला.

महत्त्वाच्या बातम्या-

जोफ्रा आर्चरचा बीमर डोक्याला लागण्यापासून थोडक्यात वाचला हार्दिक; तर स्टुअर्ट ब्रॉडने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

आयपीएलमुळे ‘या’ मोठ्या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत ऑस्ट्रेलियन खेळाडू

‘या’ आयएसएल संघाने सुरु केला सराव

ट्रेंडिंग लेख-

टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा आकडा पार करणारे ३ भारतीय क्रिकेटर

२००३ विश्वचषकात ७ ओव्हरमध्ये ६७ धावा ते २०११ ला ३ मेडन ओव्हर टाकणाऱ्या झहीरचा आज बड्डे

षटकार किंग! आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार मारणारे ५ फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---