इंग्लंड विरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत कुलदीप यादवने सर्वोत्तम कामगिरी केली होती.
या कामगिरीच्या जोरावर कुलदीपचा इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी 18 सदस्सीय भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
मात्र कुलदीपच्या भारतीय कसोटी संघातील समावेशाने भारताचे माजी फलंदाज मुंबईकर संजय मांजरेकरांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली आहे.
Not liking the trend of wrist spinners getting ahead in race for spots in Tests based on their limited overs performances.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) July 21, 2018
“मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीच्या आधारे रिस्ट स्पिनर्सना कसोटी संघात संधी देणे मला पटलेले नाही.” असे आपल्या ़ट्विटमध्ये म्हणत, मांजरेकरांनी कुलदीप यादवचे नाव न घेता त्याच्या निवडीवर नाराजी दर्शवली.
कुलदीप यादव गेल्या एक वर्षापासून भारताच्या टी-20 आणि एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य आहे. आयपीएल पूर्वी पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत अप्रतिम कामगिरी केली होती.
त्यानंतर इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतही भारताकडून एकमेव कुलदीप यादवने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-म्हणून सचिन तेंडुलकरने इंग्लंडमध्ये सुरु केली क्रिकेट अकादमी
-अनिल कुंबळेचा विक्रम थोडक्यात वाचला, दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूने एका डावात बाद केले 9 फलंदाज