तमिळनाडू प्रीमियर लीगचा २०२२ या वर्षीचा हंगाम नुकताच पार पडला. अंतिम सामन्यात पावसामुळे पूर्ण षटकांचा खेळ न झाल्याने लायका कोवई किंग्स व चेपॉक सुपर गिलीज या संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू संजय यादव हे नाव सर्वाधिक चर्चेत राहिले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेला संजय या स्पर्धेत असा काही चमकला की, अनेक मोठमोठे पराक्रम त्याने आपल्या नावे केले.
नेल्लई रॉयल किंग्जच्या या खेळाडूने स्पर्धेत सर्वाधिक ४५२ धावा केल्या. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरविण्यात आले. डावखुरा फलंदाज असलेल्या संजय यादवने ९० पेक्षा जास्तच्या सरासरीने धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही १९० च्या जवळ होता. संजयने या स्पर्धेत एक शतक आणि ५ अर्धशतके झळकावली. स्पर्धेत त्याने सर्वाधिक ४० षटकार ठोकले. तर त्याच्या बॅटमधून २१ चौकारही आले. तसेच तो ६ बळी घेण्यातही यशस्वी ठरला. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीनंतरही त्याचा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही.
संजयने यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी पण केले होते. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तो केवळ दुसऱ्या चेंडूवर एकही धाव न करता बाद झाला. मात्र, टीएनपीएलमधील त्याच्या कामगिरीनंतर पुढील हंगामासाठी त्याला संघात कायमही करू शकते.
अंतिम सामना पावसाने धुतला गेला
तामिळनाडू प्रीमियर लीगची फायनल लायका कोवई किंग्स आणि चेपॉक सुपर गिलीज यांच्यात झाली. पावसामुळे दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना कोवई किंग्जने १३८ धावा केल्या. पावसामुळे हा सामना प्रत्येकी १७ षटकांचा केला गेला होता. यानंतर चेपॉक सुपर गिलीजच्या फलंदाजीदरम्यान चार षटके पूर्ण होताच पाऊस आला. चेपॉकचे दोन गडी पावसापूर्वी बाद झालेले. अंतिम सामन्यात चार बळी घेणाऱ्या संदीप वॉरियरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याच्याशिवाय आर साई किशोरनेही ३ बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
CWG 2022 | कॉमनवेल्थ गेम्समध्ये सायकलस्वारांनी सोडला ट्रॅक, पाहा भीषण अपघाताचा व्हिडिओ
न्यूझीलंड कर्णधाराच्या मनात निवृत्तीचा विचार? दिले स्पष्टीकरण
पहिल्या टी-२० विजयानंतर टीम इंडियाचा विशेष सन्मान, रोहितला मिळाले स्पेशल गिफ्ट