---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये संजू सॅमसन-अभिषेक शर्माची विश्वविक्रमी ओपनिंग! पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपमध्ये घडले ‘असे’

On: रविवार, मार्च 8, 2026 7:56 PM
---Advertisement---

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (८ मार्च) भारत-न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना सुरू आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यास आक्रमक सुरूवात केली. दोघांनी ४ षटकातच टी20 विश्वचषकाचा एक विक्रम मोडीत काढला.

पुरुषांच्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 50 पेक्षा अधिक धावांची सलामी भागीदारी करण्याचा विक्रम आता संजू सॅमसन-अभिषेक शर्मा यांच्या नावावर झाला आहे. दोघांनी ४ षटकात चौकार-षटकारांचा पाऊस पाडत ५१ धावा पूर्ण केल्या आणि इतिहास रचला. तसेच पहिल्यांदाच पुरुष टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ५० धावांची सलामी भागीदारी झाली आहे.

याआधी पुरुषांच्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक सलामी भागीदारीचा विक्रम पाकिस्तानच्या कामरान अकमल आणि शाहजैब हसन यांच्या नावावर होता. दोघांनी २००९ मध्ये लॉर्ड्सवर श्रीलंकेविरुद्ध ४८ धावांची सलामी भागीदारी केली होती. तसेच भारतीय जोडीने सर्वोत्तम भागीदारी २५ धावांची केली होती, ती गौतम गंभीर आणि युसूफ पठाण यांनी २००७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध केली होती.

टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीत सर्वात जलद संघाने केलेल्या १०० धावा हा विक्रमही भारताच्या नावावर झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताने ७.२ षटकातच १०० धावा केल्या.

अभिषेकने न्यूझीलंडविरुद्ध १८ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या.

टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीत सर्वात जलद संघ शतके-
७.२ षटके – भारत विरुद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद, २०२६

७.५ षटके – न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता, २०२६
८.१ षटके – इंग्लंड विरुद्ध भारत, मुंबई आफ्रिका, २०२६
८.३ षटके – भारत विरुद्ध इंग्लंड, मुंबई आफ्रिका, २०२६

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---