रविवारी (११ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग २०२०चा २६वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झालेल्या या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेत जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. मात्र पहिल्या ५ षटकांच्या आतच त्यांचा सलामीवीर फलंदाज जॉनी बेयरस्टो झेलबाद झाला.
झाले असे की, वॉर्नर आणि यष्टीरक्षक फलंदाज बेयरस्टो सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरले. मात्र राजस्थानच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत पहिल्या ४ षटकात दोघांना एकही चेंडू सीमारेषेबाहेर पाठवू दिला नाही. पुढे डावातील पाचवे षटक टाकण्यासाठी कार्तिक त्यागी आला.
त्यागीच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बेयरस्टोने जोरदार षटकार लगावला. त्यानंतर पुढील चेंडूवर बेयरस्टोने ऑन साइडवर मोठा शॉट मारला. परंतु त्या बाजूला क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या संजू सॅमसनने चेंडूवर लक्ष ठेवले आणि वेगाने पळत येत डाइव्ह घेत तो चेंडू पकडला.
https://twitter.com/flickofwrists/status/1315239354718064640?s=20
Diving into his 💯th #IPL game with a spectacular catch!
Has Sanju Samson struck a decisive blow in this match with that stunner?#SRHvRR, #Dream11IPL | LIVE NOW | Star Sports Network & Disney+Hotstar VIP pic.twitter.com/dRdmA6X8Kc
— Star Sports (@StarSportsIndia) October 11, 2020
त्यामुळे बेयरस्टो १९ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने केवळ १६ धावा करत पव्हेलियनला परतला.
महत्त्वाच्या बातम्या-
आला रे! हैदाराबदविरुद्धच्या सामन्यातून राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे पुनरागमन
महिला आयपीएल: बीसीसीआयने घोषित केले वेळापत्रक आणि संघ; पाहा कोणाला मिळाली कर्णधारपदी संधी
…आणि हार्दिक पंड्याने सचिनची भविष्यवाणी खरी करुन दाखवली
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ
फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा