भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने अनेकदा गरजूंना मदत केली आहे. त्याने कोरोना काळातही लोकांची मदत केली होती. तसेच एकदा त्याला मिळालेली बक्षिसरूपी रक्कम त्याने मैदानावरील कर्मचार वर्गाला वाटलेली. आता सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, तो किती मोठ्या मनाचा आहे. त्याने यावेळी एक युवा फुटबॉलपटूला मदत केली आहे. त्याने या युवकाला विदेशात जाण्यासाठी तिकिट काडून दिले आहे. यानंतर चाहते सॅमसनचे कौतुक करत आहेत. याबाबत तमिळनाडूचे सांस्कृतिक आणि युवक कल्याण मंत्री राजी चेरन यांनी एक फेसबुक पोस्ट करून त्याचे कौतुक केले आहे.
मन्नार कुटमपूरचा रहिवासी असलेला आदर्श सध्या थिरुवल्ला आरथओमा कॉलेजमध्ये विद्यार्थी आहे. त्याला स्पेनच्या पाचव्या डिविजन लीग सीडी ए वर्जन डेल कमिनोच्या एक महिन्याच्या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी निवडले गेले आहे. या ठिकाणी त्याला पाच सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये जर त्याने चांगले प्रदर्शन केले तर, त्याला करारही मिळू शकतो. मात्र, त्या स्पेनला जाण्यासाठी विमानाचे तिकिट काढावे लागणार होते आणि त्यासाठी त्याच्याकडौ पैसे नव्हते. अशात संजू सॅमसनने त्याच्या विमान तिकिटाची व्यवस्था करून दिली आहे. यानंतर सॅमसनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे
चेरन यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून सॅमसनचे कौतुक केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “आमची जबाबदारी होती की, आम्ही या युवा खेळाडूची मदत करावी, पण सगळी कारवाई करण्यासाठी वेळ लागला असता आणि आदर्शला लवकरात लवकर स्पेनला निघणे गरजेचे होते. अशात संजू सॅमसन पुढे आले आणि आदर्शचे विमानाचे तिकिट स्पॉन्सर केले. यानंतर कराकड लियो क्लबने ५० हजार रुपये दिले. आदर्श उद्या मॅड्रिडला जाईल. तो रोनाल्डोचा मोठा चाहता आहे आणि आता त्याच्यासारखाच बनायला चालला आहे. मला आशा आहे की, ही संधी त्याच्यासाठी महत्वाची ठरेल.”






