संजू सॅमसन सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. विकेटकीपर-फलंदाज असलेल्या सॅमसनची लोकप्रियता अधिक असून ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगात कुठेही क्रिकेट खेळा त्याचे चाहते तेथे असतातच. विशेष म्हणजे त्याचे चाहते कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषकातही दिसले.
फिफा विश्वचषकाचा यंदा 22वा हंगाम खेळला जात असून त्या स्पर्धेत संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेयर केले आहे. ज्यामध्ये संजूचे चाहते फुटबॉल सामन्यादरम्यान त्याचा फोटो असलेला मोठा बॅनर हातात घेऊन पोज देताना दिसले.
Everybody: Who are you supporting at the FIFA World Cup?
Us: pic.twitter.com/e66NRg78dh
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) November 27, 2022
न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात संजूला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याने 38 चेंडूत 36 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने श्रेयस अय्यर याच्यासोबत पाचव्या विकेटसाठी 77 चेंडूत 94 धावांची भागीदारी देखील केली. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. त्या सामन्यात त्याला अंतिम अकरामध्ये घेतले नव्हते. यामुळे त्याच्या चाहत्यांनी प्रभारी कर्णधार शिखर धवन आणि मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर टीका केल्या.
धवनने संघात सहाव्या गोलंदाजीसाठी सॅमसनला बाहेर बसवले गेले, असे कारण सांगितले. त्यावर माजी फिरकपटू मुरली कार्तिक याने तर त्याला सहाव्या गोलंदाजाच्या पर्यायसाठी बसवणे अयोग्य होते, असे म्हटले. कार्तिक सध्या समालोचन करतो. त्याने प्राईम व्हिडिओवर म्हटले, भारताच्या पहिल्या सहा क्रमांकामधील कोणीच गोलंदाजी करत नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. सॅमसनला बाहेर करणे हा कठीण निर्णय होता. आपणा सर्वांना माहित आहे, तो किती उत्तम खेळाडू आहे ते. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही उत्तम फलंदाजी केली. यामुळे त्याला संधी मिळायल्या हव्या.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारत 1-0 असा मागे आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 30 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. या सामन्यात तरी सॅमसनला संधी मिळेल का हे पाहण्यास सर्वच आतुर आहेत. Sanju Samson fans also appeared in FIFA World Cup Qatar Rajasthan royals share pic
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गज म्हणतोय, ‘पृथ्वी शॉ टीम इंडियाचा कर्णधार होण्याचा दावेदार’
भारताच्या दिग्गजाचा मोफत सल्ला; म्हणाले, ‘भारताने वनडेत एकच संघ खेळवावा…’