---Advertisement---

धोनीविरुद्ध खेळताना केलेली ‘ही’ चूक सॅमसनला पडली महागात! आयपीएलकडून मोठी कारवाई

On: गुरूवार, एप्रिल 13, 2023 1:00 PM
Sanju Samson Ravi Ashwin
---Advertisement---

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सकडून चेन्नई सुपर किंग्जला 3 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. एमएस धोनी याने शेवटच्या चेंडूपर्यंत विजयाच्या आशा काय ठेवल्या होत्या. पण संदीप शर्माने कसलेली गोलंदाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. राजस्थानसाठी शेवटच्या चेंडूवर मिळवलेला हा विजय खास आहे. पण त्यांचा कर्णधार संजू सॅसमन याला आयपीएलच्या मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले.

एमएस धोनी (MS Dhoni) आणि संजू सॅसमन (Sanju Samson) या सामन्या आपल्या आपल्या संघाचे नेतृत्व करत होते. दोघांनी कर्णधार म्हणून आपली भूमिका चोख पार पाडली. विजयासाठी शेवटच्या चेंडूवर सीएसकेला 5 धावा हव्या होत्या. स्ट्राईकवर असलेल्या धोनीने चौकार जरी मारला, असता, तरी सुपर ओव्हर झाली असती. मात्र संदीप शर्मा याने शेवटचा चेंडू अचूक यॉर्कर टाकला, जो धोनीला देखील खेळता आला नाही. सीएसकेला या चेंडूवर फक्त एख धाव मिळाली आणि 3 धावांनी पराबव स्वीकारावा लागला.

संदीप शर्मा (Sandeep Sharma) आणि राजस्थान रॉयल्ससाठी नक्कीच हा विजय खास ठरला. मात्र कर्णधार संजू सॅमसनसला मात्र 12 लाखांचा दंड भरावा लागला. षटकांची गती राखता न आल्यामुळे संजू सॅमसनवर आयपीएलकडून ही कारवाई केली गेली. ठरावीक वेळेपेक्षा सामना जास्तवेळा चालल्याने आयपीएलने हे पाऊल उचलले. आयपीएलकडून सांगण्यात आले की, “चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध बुधवारी राजस्थान रॉयल्सने षटकांची गती न राखल्याने दंड ठोठावला गेला आहे. हंगामात पहिल्यांदाच संघाकडून षटकांची गती राखली गेली नाहीये. त्यामुळे केवळ कर्णधार संजू सॅमसनवर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे.”

राजस्थान रॉयल्स आयपीएल  2023 मधील दुसरा असा संघ आहे, ज्यांना षटकांची गती राखता आली नाहीये. याआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसवर देखील 12 लाखांचा दंड ठोठावला गेला आहे. आरसाबीने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती राखली नव्हती. आरसीबीने चालू हंगामात दुसऱ्यांदा जर षटकांची गती राखली नाही, तर कर्णदार सॅमसनसह संघातील खेळाडूंवर देखील दंड ठोठावला जाऊ शकतो.

दरम्यान, सीएसके आणि राजस्थान यांच्यातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 8 बाद 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसके संघ 20 षटकांमध्ये 6 बाद 172 धावांपर्यंत मजल मारू शकला. (Sanju Samson has been fined Rs 12 lakh by IPL)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

‘मृत्यू यायचा तिथेच येतो’, भारतीय संघाबाबत पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे वादग्रस्त विधान
जड्डूची टी20 मध्ये ‘डबल सेंच्युरी’! रॉयल्सच्या डावाला ब्रेक लावत पार केला मैलाचा दगड   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---