केरळ विरुद्ध गुजरात संघात सध्या रणजी ट्रॉफी 2018-19 स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामना सुरु आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर केरळने दुसऱ्या डावात सर्वबाद 171 धावा करत पहिल्या डावातील 23 धावांच्या आघाडीसह गुजरातसमोर 195 धावांचे आव्हान ठेवले आहे.
या सामन्यात आज(16 जानेवारी) दुसऱ्या दिवशी केरळचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन हा बोटाची दुखापत असतानाही संघासाठी एका हाताने फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता.
सॅमसनला या सामन्यात पहिल्या दिवशी फलंदाजी करत असताना बोटाला फ्रॅक्चर झाले होते. पण तरीही तो आज संघाच्या 9 विकेट्स गेल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरला.
विशेष म्हणजे त्याने जवळजवळ चार षटके जलज सक्सेनाला साथ दिली. सॅमसनला यावेळी एकही धाव काढण्यात अपयश आले. मात्र त्याने 9 चेंडूंचा सामना केला. अखेर त्याला गुजरातचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने पायचीत बाद केले आणि केरळचा दुसरा डाव संपुष्टात आणला.
सॅमसनने दुखापत असतानाही संघहिताला प्राधान्य दिल्याने सर्वांनी त्याचे कौतुक केले आहे.
Few hours ago, Sanju Samson was with broken finger but now batting in the crease when Kerala is 9 down for getting more lead for Kerala in the second innings.
Pic credit : @narayanantweaks. pic.twitter.com/stQxSoYXmb
— Johns. (@CricCrazyJohns) January 16, 2019
या सामन्यात केरळने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 185 धावा केल्या होत्या. या डावात फलंदाजी करताना सॅमसन दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो 17 धावांवर असताना रिटायर्ड हार्ट होऊन मैदानाबाहेर गेला होता.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या गुजरातला पहिल्या डावात सर्बबाद 162 धावाच करता आल्या. त्यामुळे केरळने 23 धावांची आघाडी घेतली होती.
दुखापतग्रस्त असतानाही मैदानात उतरले होते हे खेळाडू-
या आधीही अनेकदा क्रिकेटपटू दुखापतग्रस्त असताना मैदानात खेळण्यासाठी उतरले आहेत. यात भारताचा अनिल कुंबळे आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी महान कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांची आठवण कायम लक्षात राहते.
कुंबळेने जबडा तुटला असताना गोलंदाजी करत ब्रायन लाराला बाद केले होते. तर ग्रॅमी स्मिथ हा 2009 मध्ये सिडनी कसोटीत पहिल्या डावात एक हात मोडला असताना संघासाठी दुसऱ्या डावात आणि सामन्यातील चौथ्या डावात 10व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यावेळी तो चक्क 26 चेंडूही खेळला.
“It’s not quite a Graeme Smith walking out with a broken hand moment, but I’ll claim it anyway.” – @DaleSteyn62 #ProteaFire pic.twitter.com/asridzHzjg
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 8, 2018
https://twitter.com/BipLobMahmuD_/status/1040997724605358087
महत्त्वाच्या बातम्या-
–मुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा
–जेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द
–दिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह