आयपीएल २०२२ मध्ये चाहत्यांना मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. आयपीमध्ये पुढच्या हंगामासाठी दोन नवीन संघांची घोषणा करण्यात आली आहे. या दोन संघांची नावे लखनऊ आणि अहदाबाद या दोन शहरांच्या नावाने असणार आहेत. या दोन संघांना चांगल्या खेळाडूंना विकत घेता येण्यासाठी आयपीएलचा पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मेगा लिलाव आयोजित केला जोणार आहे. या लिलावामध्ये अनेक दिग्गजांवर बोली लागताना दिसणार आहे. आता याच पार्श्वभूमीवर रायस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पुढच्या हंगामापूर्वी त्याच्या फ्रँचायझीला रामराम ठोकण्याविषयी चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
संजू सॅमसन पुढच्या वर्षी आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक चेन्नई सुपर किंग्जमध्ये जाण्याची शक्यता चाहते व्यक्त करत आहेत. दरम्यान, ही चर्चा सुरू होण्यामागे संजू सॅमसन स्वत: कारणीभूत आहे. संजू यापूर्वी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून त्याच्या फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सला फॉलो करत होता, पण आता त्याने रॉयस्थान रॉयल्सला त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून अनफॉलो केले आहे. एवढेच नाही, तर संजूने त्याच्या सध्याच्या फ्रँचायझीला अनफॉलो करून चेन्नई सुपर किंग्जला फॉलो केले आहे. संजूने चेन्नईला फॉलो केल्यानंतर चाहत्यांमध्ये या गोष्टीची प्रचंड चर्चा सुरू आहे. यानंतर संजू आता राजस्थान संघाची साथ सोडेल, असे अनेकांनी म्हटले आहे. चाहते याविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
https://twitter.com/feviyanpaulson2/status/1456661859075977218?t=RDEUqWNL_MqfenHQ580v_Q&s=08
दरम्यान, आयपीएलमध्ये यावर्षी संजूने जबरदस्त प्रदर्शन केले आहे. त्याने यावर्षी त्याच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने यावर्षी रायस्थान रॉयल्ससाठी ४०.३३ च्या सरासरीने आणि १३६.७२ च्या स्ट्राइक रेटने ४८४ धावा ठोकल्या आहेत. यामध्ये त्याच्या एका शतकी खेळीचा दोन अर्धशतकांचाही समावेश आहे.
आयपीएलच्या या हंगामात कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने १४ पैकी केवळ ५ सामने जिंकले आहेत आणि संघ प्लेऑमध्येही पोहोचू शकला नव्हता. असे असले, तरी वैयक्तिक कर्णधाराचे प्रदर्शन पाहिले, तर समाधानकारक आहे. जर चेन्नई सुपर किंग्जने पुढच्या हंगामात त्याला संघात सामील केले, तर संघाला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘हा’ भारतीय फलंदाज मोडतो विरोधकांचे कंबरडे; माजी पाकिस्तानी दिग्गजाने गायले गोडवे
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”





