इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १५ व्या हंगामाचा शेवटचा अध्याय सध्या सुरू आहे. गुजरात टायटन्स संघाने पहिला क्वालिफायर सामना जिंकत अंतिम सामन्यात आपली जागा निश्चित केली आहे, तर राजस्थान रॉयल्सला पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभव पत्कारावा लागला. दुसरीकडे एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाने लखनऊच्या संघाला मात देत दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळे २७ मे रोजी बेंगलोर विरुद्ध राजस्थान अशी दुसऱ्या क्वालिफायरची लढत होणार आहे.
या लढतीत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला (Sanju Samson) रोखण्यासाठी बेंगलोरकडे (Royal Challengers Bangalore) दोन हुकमी एक्के आहेत. हे गोलंदाज संजू सह राजस्थानच्या संघाला कमी धावांवर रोखण्यास सक्षम ठरू शकतील असे विश्लेषण क्रिकेट समिक्षकांकडून केले जात आहे.
१. वानिंदू हसरंगा
हसरंगाने (Wanindu Hasranga) यंदाच्या हंगामात बेंगलोरसाठी चांगली गोलंदाजी केली आहे. यंदाच्या हंगामातील १३ व्या सामन्यात राजस्थान विरुद्ध खेळताना हसरंगाने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला ८ धावांवर बाद केले होते. त्यामुळे संजूला या महत्त्वाच्या सामन्यात जबाबदारीने खेळायची गरज आहे. जर संजू हसरंगाविरुद्ध चांगला खेळ करण्यास अयशस्वी ठरल्यास राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.
२. मोहम्मद सिराज
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात बेंगलोरचा जलद गतीचा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj) विशेष कामगिरी करण्यास असफल ठरला. मात्र राजस्थान विरुद्ध झालेल्या दोन सामन्यात सिराजने दोन-दोन बळी घेतले आहेत. त्यामुळे राजस्थान विरुद्ध खेळत असताना सिराज प्रत्येक वेळी चांगली कामगिरी करत असल्याचे जाणवते. म्हणूनच सिराज क्वालिफायर दोनच्या सामन्यात राजस्थान संघासाठी डोकेदुखी ठरू शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आयपीएलच्या चालू हंगामामध्ये सॅमसनने कर्णधारपदासह शानदार फलंदाजी केली आहे. जॉस बटलर (७१८) नंतर तो राजस्थानसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत १५ सामन्यात ४२१ धावा केल्या आहेत. सॅमसनने या मोसमात २ अर्धशतकेही झळकावली आहेत.
दरम्यान, आयपीएलच्या या मोसमात हसरंगाने आतापर्यंत १५ सामन्यात १६.१६ च्या सरासरीने २५ बळी घेतले आहेत. तो प्रत्येक १३व्या चेंडूवर एक शिकार करत आहे. त्याने या मोसमात युझवेंद्र चहल (२६ विकेट) नंतर सर्वाधिक विकेट घेतल्या असून पर्पल कॅपच्या शर्यतीत दोन गोलंदाजांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे.
महा स्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
चहलला खुणावतायेत मोठे विक्रम! बेंगलोरविरुद्ध कमाल करत मलिंगा, बुमराहलाही ठरू शकतो वरचढ
एकेकाळचा भारतीय संघाचा ‘पोस्टर बाॅय’ ते सतत चर्चेत राहणारा टीम इंडियाचा प्रशिक्षक