बांगलादेश विरुद्ध कसोटी (BANvIND)मालिका जिंकल्यानंतर भारत घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध टी20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी भारताचा संघ जाहीर झाला असून हार्दिक पंड्या टी20 आणि रोहित शर्मा वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे. चाहत्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे भारताच्या टी20 संघात संजू सॅमसनचे पुनरागमन झाले आहे, मात्र वनडे संघात त्याला जागा मिळाली नाही.
संजू सॅमसन (Sanju Samson) याची कारकिर्द पाहिली तर निवडकर्त्यांनी त्याला खूपच कमी संधी दिल्या आहेत. तो चांगली कामगिरी करूनसुद्धा संघाच्या बाहेर अधिक काळ राहिला आहे. टी20 विश्वचषकातही संजूला संघात घेतले नव्हते. यामुळे अनेकजण बीसीसीआयच्या निर्णयावर निराश होते. तसेच त्याला नंतर झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडले गेले, मात्र त्या वनडे मालिकेत तो केवळ एकच सामना खेळला होता. तर बाकी दोन वनडे सामन्यांसाठी तो भारताच्या अंतिम अकराचा भाग नव्हता.
सॅमसनने भारताकडून शेवटचा टी20 सामना 2022च्या ऑगस्टमध्ये खेळला होता. वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना भारताने 88 धावांनी जिंकला होता. त्या सामन्यात सॅमसनने 15 धावा केल्या होत्या.
#TeamIndia squad for three-match T20I series against Sri Lanka.#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/iXNqsMkL0Q
— BCCI (@BCCI) December 27, 2022
रिषभ पंत (Rishabh Pant) याला श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही मालिकांमधून बाहेर केले आहे. त्याने नुकतेच बांगलादेश दौऱ्यातील कसोटी मालिकेत उत्तम कामगिरी केली होती. त्याची मागील कामगिरी पाहिली तर तो क्रिकेटच्या मर्यादीत षटकांमध्ये योग्य अशी कामगिरी करू शकला नाही. मग तो टी20 विश्वचषक असो वा न्यूझीलंड दौरा. तो धावा करण्यात अपयशी ठरला, मात्र कसोटीमध्ये तो अप्रतिम खेळाडू आहे. Sanju Samson In for India team vs Sri lanka T20 Series
भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी20 सामना 3 जानेवारीला मुंबईमध्ये खेळला जाणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी व मुकेश कुमार.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एटीके मोहन बागानचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त, गोवाविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात कसे होणार?
अखेर पंतला दाखवला गेला बाहेरचा रस्ता! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांमधून मिळाला डच्चू