इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२च्या अंतिम सामन्याची लढत गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स अशी होणार आहे. राजस्थानचा संघ तब्बल १४ वर्षांनी अंतिम सामन्यात येऊन पोहोचला आहे. हा कारनामा करणाऱ्या राजस्थान संघाची धुरा आहे ती युवा संजू सॅमसनच्या हाती. याच संजू सॅमसनने मैदानात आपली चमक दाखवली आहे. मात्र, वैयक्तिक आयुष्यातील संजूबद्दल एक अशी गोष्ट आहे, जी ऐकून प्रत्येकाला आनंद होईल. ती गोष्ट आहे संजूच्या प्रेमाची.
The best Christmas Gift is to realise how much we already have !!!☺️🙏🏼#merrychristmas🎄 pic.twitter.com/0UxwGKJjCy
— Sanju Samson (@IamSanjuSamson) December 25, 2020
अशी आहे संजूची प्रेमकहाणी
केरळचा २७ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने (Sanju Samson) त्याची कॉलेज प्रेयसी चारुलतासोबत लग्न केले. या दोघांची प्रेमकहाणी कदाचित तुम्हाला माहीत नसेल. चारुलता ही केरळमधील तिरुवनंतपुरमची रहिवासी आहे. संजू सॅमसन आणि चारुलता हे कॉलेजचे वर्गमित्र होते. ते दोघे मार इव्हानिओस कॉलेजमध्ये एकत्र शिकले. खरं तर ही प्रेमकहाणी संजू सॅमसनने सुरू केली होती. सॅमसनने चारुलता हिला फेसबुकवर फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतरच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. यानंतर त्यांचे प्रेम फुलले आणि दोघांनी त्यांच्या घरी सांगितले. दोघांच्या घरच्यांनीही नकार न देता लग्नाला होकार दिला. त्यानंतर त्यांनी लग्न केले.
Happy Onam Everyone 🌸☺️🙏🏼 pic.twitter.com/HfUvCAJsSq
— Sanju Samson (@IamSanjuSamson) August 21, 2021
संजू सॅमसन आणि चारुलता यांचे नाते ५ वर्षांपासून होते. २२ डिसेंबर, २०१८ रोजी दोघांचे लग्न झाले. संजू सॅमसन ख्रिश्चन आहे, तर चारुलता हिंदू नायर आहे. दोघांचे लग्न कोवलम शहरात झाले होते, ज्यामध्ये फार कमी लोक उपस्थित होते. सॅमसनची बायको खूप सुंदर आहे. ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही. चारुलताने तिरुवनंतपुरममध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले.
Today we celebrate the best decision WE ever made !!!
Happy Anniversary My ❤️ pic.twitter.com/QyE3fXrc5C— Sanju Samson (@IamSanjuSamson) December 22, 2020
यंदाच्या आयपीएल हंगामात संजूची विशेष कामगिरी
आयपीएल २०२२ मध्ये, संजूच्या नेतृत्वाखाली, संघाने १४ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या हंगामात संजूने १६ सामन्यात ४४४ धावा केल्या आहेत. शिवाय यंदाच्या हंगामात त्याने राजस्थानच्या संघाचे नेतृत्व चांगल्या पद्धतीने केले आहे. त्यामुळेच सध्या राजस्थानचा संघ आयपीएल २०२२चा अंतिम सामना खेळण्यास सज्ज आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नरेंद्र मोदी स्टेडियम | सर्वाधिक प्रेक्षकांची व्यवस्था तर आहेच, पण मैदानाच्या ‘या’ बाबी आहेत विशेष
आयपीएलच्या फायनल आधीच चहलच्या पत्नीने लावला ठुमका, ‘जिगल जिगल’ गाण्यावरील व्हिडिओने लुटली वाहवा!
IPL 2022। हार्दिकची ‘ही’ आकडेवारी देतेय गुजरातच्या विजेतेपदाची ग्वाही, पाहा नक्की काय आहे विक्रम