भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका संपल्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात आहे. 10 डिसेंबर रोजी सुरू होणारा हा दौरा 7 जानेवारीपर्यंत चालेल. तिन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ भिडणार असून गुरुवारी (30 नोव्हेंबर) भारताच्या वनडे संघाची घोषणा केली गेली. वनडे मालिकेसाठी निवडलेला संघ पाहून चाहत्यांमध्ये आनंद पसरला आहे. संघाचे कर्णधारपद केएल राहुल याच्याकडे सोपवले गेले आहे.
भारताला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सर्वात आधी टी-20 मालिका खेळायची आहे. 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर यादरम्यान तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. उभय संघांतील वनडे मालिका 17 डिसेंबर रोजी सुरू होईल आणि 21 डिसेंबर रोजी संपेल. उभय संघातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 26 डिसेंबर ते 7 जून यादरम्यान खेळली जाणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी (30 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ घोषित केला. यात संजू सॅमसन (sanju samson) याचेही नाव होते. सॅमसन यावर्षी ऑगस्ट महिन्यात भारतासाठी शेवटचा वनडे सामना वेस्ट इंडीज संघाविरुद्ध खेळला होता.
सॅमसनव्यतिरिक्त रजत पाटिदार (Rajat Patidar) यालाही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकासाठी निवडले गेले आहे. नवख्या पाटिदारसाठी या दौऱ्यात भारताकडून पदार्पणाची संधी मिळू शकते. (Sanju Samson & Rajat Patidar included in the South Africa ODIs)
India’s squad for 3 ODIs: Ruturaj Gaikwad, Sai Sudharsan, Tilak Varma, Rajat Patidar, Rinku Singh, Shreyas Iyer, KL Rahul (C)(wk), Sanju Samson (wk), Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Yuzvendra Chahal, Mukesh Kumar, Avesh Khan, Arshdeep Singh, Deepak Chahar.#SAvIND
— BCCI (@BCCI) November 30, 2023
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटिदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.
महत्वाच्या बातम्या –
IND vs SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतातून जाणार तब्बल 45 खेळाडू, बीसीसीआयने व्हिसासाठी केला अर्ज
‘आता परिणाम भोगा…’, 24 वर्षीय गिलच्या हाती कर्णधारपदाची सूत्रे देताच डिविलियर्सची गुजरातला चेतावणी





