‘सामना कधी हातातून निसटला कळलंच नाही’, आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर सॅमसनची कबुली

'सामना कधी हातातून निसटला कळलंच नाही', आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर सॅमसनची कबुली

राजस्थान राॅयल्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा १३ वा सामना खेळला गेला, ज्यामध्ये आरसीबीला ४ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) सुद्धा या सामन्यात काही खास कामगिरी करु शकला नाही. त्याने ८ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ८ धावा केल्या.राजस्थान राॅयल्सचा हा १५ व्या हंगामातील पहिलाच पराभव आहे. याबद्दल सॅमसनने प्रतिक्रिया दिली आहे. 

संजू सॅमसन म्हणाला, “सामना कधी आमच्या हातातून सुटला, तो क्षण सांगू शकत नाही. परंतु, नाणेफेक गमावल्यानंतर आमच्या संघाने ही धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला. ही सन्मानजनक धावसंख्या होती. सामन्यात अनेक सकारात्मक गोष्टी झाल्या आणि आम्ही यातून खूप काही शिकू शकतो.”

आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस म्हणाला, “अशा पद्धतीने पुनरागमन करण्यासाठी चांगल्या खेळाडूची गरज असते आणि दिनेश कार्तिक त्यापैकीच एक खेळाडू आहे. तो एवढा शांत असतो की, दुसरे त्याच्यासोबत सहजच खेळतात.”

तो म्हणाला, “मला वाटते की आम्ही १९ व्या षटकापर्यंत शानदार गोलंदाजी केली होती, परंतु जाॅस बटलरने काही शाॅट खेळत गोलंदाजांना दबावात आणले. त्यामुळे त्यांनी जास्त धावा केल्या. युझवेंद्र चहलने चांगली गोलंदाजी केली, परंतु काही खेळाडू कोठूनही सामना परत मिळवू शकतात.”

सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करताना राजस्थानला १६९ धावांवरच रोखले. राजस्थानकडून जाॅस बटलरने सर्वाधिक ७० धावांची नाबाद खेळी खेळली. शिमराॅन हेटमायरने ४२ धावा केल्या. आरसीबीने १९.१ षटकातच १७० धावांचे लक्ष्य गाठले. संघातील शाहबाज अहमदने ४५ तर दिनेश कार्तिकने २३ चेंडूत ४४ धावांची खेळी खेळली. गुणतालिकेत राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे, तर आरसबी संघ ६ व्या क्रमांकावर आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

Video : आधी विराट मग सिराज नंतर सगळेच, वानखेडेवर RCBचे भिडू लागले नाचू

IPL 2022| केव्हा आणि कसा पाहाल कोलकाता वि. मुंबई सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

स्वस्तात आऊट झाल्यावर तंबूत मॅक्सवेलची मालीश करताना दिसला विराट कोहली, Video तुफान Viral

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.