भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा टी20 सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने (Sanju Samson) दसऱ्याच्या दिवशी हैदराबादमध्ये धावांचा पाऊस पाडला. त्याने बांगलादेशविरुद्ध टी20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. दरम्यान त्याने सलग 4 चौकार आणि सलग 5 षटकारही ठोकले. त्याने 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे अनेक रेकाॅर्ड त्याच्या नावावर झाले आहेत.
संजू सॅमसन (Sanju Samson) गेल्या 4 सामन्यात अपयशी ठरला होता. या काळात तो 2 वेळा शून्यावर बाद झाला होता. पण बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात तो जबरदस्त फाॅर्ममध्ये दिसला. सॅमसनने त्याच्या तुफानी खेळीने टीका करणाऱ्यांना रोखठोक उत्तर दिले.
सॅमसनने डावाच्या सुरुवातीलाच आक्रमकता दाखवली होती. दुसऱ्या षटकात तस्किनच्या चेंडूवर त्याने सलग 4 चौकार मारले. दरम्यान त्याने 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सलग 4 डावांत अपयशी ठरल्यानंतर त्याने 50 धावांचा टप्पा ओलांडला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) त्याला मिठी मारली. सॅमसन तिथेच थांबला नाही. त्याने डावाच्या 10व्या षटकात फिरकीपटू रिशाद हुसेनचा पहिला चेंडू हुकल्यानंतर सलग 5 षटकार ठोकले. सॅमसनने 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारतासाठी एका षटकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
36 – युवराज सिंग विरुद्ध स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड), 2007
36 – रोहित शर्मा आणि रिंकू सिंग विरुद्ध करीम जनात (अफगाणिस्तान), 2024
30 – रुतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा विरुद्ध ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), 2023
30 – संजू सॅमसन विरुद्ध रिशाद हुसेन (बांगलादेश), 2024
29 – रोहित शर्मा विरुद्ध मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), 2024
Sanju Samson – you beauty!🤯#IDFCFirstBankT20ITrophy #INDvBAN #JioCinemaSports pic.twitter.com/JsJ1tPYKgD
— JioCinema (@JioCinema) October 12, 2024
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक शतके (पूर्णवेळ संघांसाठी)
35 चेंडू – डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध बांगलादेश, 2017
35 चेंडू – रोहित शर्मा (भारत) विरुद्ध श्रीलंका, 2017
39 चेंडू- जॉन्सन चार्ल्स (वेस्ट इंडीज) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2023
40 चेंडू – संजू सॅमसन (भारत) विरुद्ध बांगलादेश, 2024
42 चेंडू- हजरतुल्ला झझाई (अफगाणिस्तान) विरुद्ध आयर्लंड, 2019
42 चेंडू – लियाम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड) विरुद्ध पाकिस्तान, 2021
पूर्णवेळ आयसीसी संघाकडून खेळताना टी20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा सॅमसन हा चौथा फलंदाज ठरला. या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 2017 मध्ये बांगलादेशविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावले होते. भारतासाठी रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे. त्याने 35 चेंडूत शतकही केले. रोहितने 2017 मध्ये इंदूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडेमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू
न्यूझीलंडविरूद्ध पहिल्यांदाच खेळणार भारताचा ‘हा’ स्टार धुरंधर!
PAK vs ENG; “क्लब संघ यापेक्षा चांगले क्रिकेट खेळतात” माजी खेळाडूने पाकिस्तानवर सोडले टीकास्त्र