---Advertisement---

रिषभचा पत्ता कट? कार्तिकसह हा यष्टीरक्षक खेळणार वर्ल्डकप; बीसीसीआय सूत्रांची माहिती

On: गुरूवार, सप्टेंबर 8, 2022 6:31 PM
---Advertisement---

सध्या भारतीय क्रिकेट संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आशिया चषक स्पर्धेत सहभागी झाला आहे. स्पर्धेतील संघाची कामगिरी खराब झाली असून, संघाला अंतिम फेरीत जागा मिळवण्यात अपयश आले. भारताच्या या अपयशानंतर संघनिवडीवर जोरदार टीका होतेय. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी देखील लवकरच संघनिवड जाहीर होईल. आता या संघात यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतच्या जागी अन्य एका खेळाडूची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आशिया चषकात भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत व दिनेश कार्तिक त्यांना संधी दिली गेली होती. कार्तिकला पहिल्या दोन सामन्यात खेळवले. मात्र, त्याला पुरेशी फलंदाजीची संधी मिळाली नाही. तो केवळ दोन चेंडू खेळू शकला व त्यातही नाबाद राहिला. दुसरीकडे पंतला सुपर फोरच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळवले गेले. मात्र, तो दोन्ही सामन्यात खराब फटके खेळून बाद झाला. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच कारणाने दिनेश कार्तिक हा संघाचा प्रमुख यष्टीरक्षक असावा अशी मागणी चाहते करत आहेत.

बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘संजू सॅमसन हा विश्वचषकात भारतीय संघाचा भाग असण्याची दाट शक्यता आहे. रिषभच्या खराब फॉर्ममूळे त्याला संधी मिळू शकते. कार्तिक हा प्रमुख यष्टीरक्षकाची भूमिका बजावू शकतो.”

संजू सॅमसन हा मागील काही काळापासून भारतीय संघाचा सदस्य आहे. त्याने आयर्लंड तसेच वेस्ट इंडिज व झिम्बाब्वे दौऱ्यावर शानदार कामगिरी केली होती. मात्र, आशिया चषकासाठी त्याचा विचार न झाल्याने अनेकांनी टीका केली होती. ‌‌

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताला विश्वचषक जिंकण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया अन् न्यूझीलंडला सामोरे जावे लागेल, वाचा T20WCचे सुधारित वेळापत्रक
पीएसएलच्या ‘फ्लॉप शो’ नंतर पाकिस्तानचा आणखी एक ‘पीजे’, पीसीबीने केली मोठी घोषणा
आशिया चषकात ‘या’ तीन चुका भारताला पडल्या महागात; जर टाळल्या तर टी-20 विश्वचषक आपलाच!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---