---Advertisement---

संजू सॅमसनचा मोठा निर्णय! ‘या’ स्पर्धेमध्ये नाही खेळणार, मोठे कारण समोर

On: शुक्रवार, ऑगस्ट 9, 2024 9:50 PM
Sanju Samson (1)
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचे (Sanju Samson) देखील भारतात तसंच भारताबाहेरही भरपूर चाहते आहेत. चाहत्यांच्या मनात त्याच्याविषयी नेहमीच प्रेम दिसून आले आहे. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात केरळ क्रिकेट लीगच्या टी20 स्पर्धेचे अनावरण करण्यात आले. ज्याची सुरुवात (2 सप्टेंबर) पासून होणार आहे. तर 19 सप्टेंबरला या स्पर्धेचा फायनल सामना खेळवला जाणार आहे. हे सर्व सामने तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड मैदानावर खेळवले जाणार आहेत.

केरळ असोसिएशच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चाहते प्रत्येक दिवशी 2 सामन्यांचा आनंद घेऊ शकतात त्यामध्ये दिवस आणि रात्री अशा दोन वेळेस सामना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये 6 संघ सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये त्रिवेंद्रम राॅयल्स, एरीज कोल्लम सेलर, एलेप्पी रिपल्स, कोच्ची ब्लू टायगर्स, त्रिशूर टायटन्स आणि कालीकट गोबस्टर्स हे सहा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. केरळ टी20 स्पर्धेसाठी लिलाव देखील होणार आहेत. या स्पर्धेसाठी 6 आयकाॅन खेळाडूंची घोषण झाली आहे. ज्यामध्ये अब्दुल बासित, सचिन बेबी, मोहम्मद अझरुद्दीन, बेसिल थम्पी, विष्णु विनोद आणि कुन्नुमल यांची नावे आहेत.

केरळ क्रिकेट लीगच्या पहिल्या हंगामात संजू सॅमसन (Sanju Samson) खेळणार नाही. सॅमसन श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग होता. सॅमसनला श्रीलंकेविरुद्ध 2 टी20 सामने खेळण्याची संधी मिळाली, पण त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. आता भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. 6 ऑक्टोबर पासून भारत आणि बांगलादेशमधील टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

संजू सॅमसनच्या (Sanju Samson) टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्ल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केलं होतं. त्यानं भारतासाठी आतापर्यंत 30 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 19.30च्या सरासरीनं 444 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईर रेट 131.36 राहिला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2 अर्धशतक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय अष्टपैलू शाहबाज अहमद गुपचूप चढला बोहल्यावर, हातात बॅट घेऊन नवरदेवाने वेधले लक्ष
नीरज चोप्राला हर्नियाचा त्रास, लवकरच करणार शस्त्रक्रिया! कोचिंग स्टाफमध्येही होणार मोठे बदल
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी भारत किती एकदिवसीय सामने खेळणार? जाणून घ्या एका क्लिकवर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---