---Advertisement---

T20WC2026: संजूला जाणीवपूर्वक डिस्टर्ब केलं गेलं; टीम इंडिया चॅम्पियन बनल्यावर संजू सॅमसनच्या वडिलांचं मोठं विधान

On: सोमवार, मार्च 9, 2026 7:38 PM
---Advertisement---

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी संजू सॅमसनने (Sanju Samson) झंझावाती फलंदाजी करत टीम इंडियाला तिसऱ्यांदा विश्वविजेता बनवण्यात मोलाची भूमिका बजावली. संजूने तीन महत्त्वाच्या सामन्यांत भारताला धडाकेबाज सुरुवात करून दिली, ज्यासाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ (player of the tournament) म्हणून निवडण्यात आले. भारताच्या या विजयानंतर संजूचे वडील सॅमसन विश्वनाथ यांनी आनंद व्यक्त केला, पण त्याचसोबत संजूच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याला सहन कराव्या लागलेल्या त्रासावरही भाष्य केले.

संजूचे वडील म्हणाले, माझ्या मुलाच्या कामगिरीचा मला अभिमान आहे. पण त्याच्या करिअरच्या सुरुवातीला काही लोकांनी त्याला खूप त्रास दिला, त्याला ‘डिस्टर्ब’ करण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की, आता काही दिवस तरी असे होणार नाही. संजूचे वडील दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल होते आणि ते स्वतः एक फुटबॉल खेळाडू राहिले आहेत.

संजूचे शिक्षण आणि सुरुवातीचे क्रिकेटचे प्रशिक्षण दिल्लीतच झाले. मात्र, उत्तम कामगिरी करूनही जेव्हा संजूची अंडर-13 संघात निवड झाली नाही, तेव्हा त्याच्या वडिलांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा (VRS) दिला आणि ते केरळला परतले, जेणेकरून संजूला तिथे चांगले प्रशिक्षण मिळू शकेल. सॅमसन विश्वनाथ यांनी सांगितले की, मी 18 व्या वर्षी दिल्ली पोलिसात भरती झालो होतो आणि 42 व्या वर्षापर्यंत तिथेच होतो. माझी मुले दिल्लीतच मोठी झाली. एका दौऱ्यात 500 धावा करूनही संजूला संघात स्थान मिळाले नाही.

निवड न होण्यामागचे कारण सांगताना ते म्हणाले, तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की संजू फक्त 10 वर्षांचा आहे आणि हा सामना 13 वर्षांखालील मुलांसाठी आहे. जर वय हेच कारण असेल, तर मेस्सी 17 व्या वर्षी आणि सचिन तेंडुलकर 15 व्या वर्षी संघात होते. केवळ लहान वयाचे कारण देऊन तुम्ही त्याला संधी नाकारत होता.

ते पुढे म्हणाले, जेव्हा एखादे मूल चांगली कामगिरी करते, तेव्हा त्याला त्याचे फळ मिळायला हवे. संजूची दिल्लीच्या संघात निवड झाली नाही, तेव्हा मी केरळला परतण्याचा निर्णय घेतला. माझी पत्नी सुरुवातीला काळजीत होती, पण मला खात्री होती की केरळमध्ये संजूला त्याचे हक्काचे स्थान मिळेल. आज मी जुन्या वाईट गोष्टी विसरलो आहे, माझ्यासाठी आता सर्व काही चांगले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---