Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“मी सचिनला शिव्या दिलेल्या” 27 वर्षानंतर माजी पाकिस्तानी खेळाडूची कबुली

March 16, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Pakistan-Team-Sachin-Tendulkar

Photo Courtesy: Twitter/ICC/BCCI


भारत आणि पाकिस्तान यांना क्रिकेटच्या मैदानावरील पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाते. उभय संघातील सामन्यांना नेहमीच युद्धाचे स्वरूप येते. दोन्ही संघातील खेळाडू देखील या सामन्यांमध्ये अत्यंत आक्रमकपणे खेळताना दिसतात. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग देखील निर्माण झालेले आहेत. अगदी विश्वचषकाच्या सामन्यात देखील उभय संघातील खेळाडूंमध्ये मोठे वाद झाल्याचे पाहायला मिळते. पाकिस्तानचा माजी दिग्गज फिरकीपटू सकलेन मुश्ताक याने अशाच एका जुन्या वादग्रस्त आठवणीला उजाळा दिला आहे.

सकलेन मुश्ताकला पाकिस्तानचा सर्वकालीन महान फिरकीपटू म्हणून ओळखले जाते. भारतीय संघाविरुद्ध तो नेहमीच उत्कृष्ट कामगिरी करताना दिसलेला. 2000 नंतरच्या दिग्गज भारतीय फलंदाजांनी भरलेल्या फलंदाजी कामाला त्याने अनेकदा संकटात टाकले. त्याच वेळचा एक किस्सा त्याने नुकताच एका पोडकास्टमध्ये सार्वजनिक केला. तो म्हणाला,

“सचिन आणि माझ्यात एका वेळी चांगलीच तूतू-मैंमैं झालेली. मी त्यावेळी काऊंटी क्रिकेट खेळून आलो होतो. कॅनडामध्ये आमचा सामना होता. त्यावेळी मी तरुण होतो. स्वतःच्या गोलंदाजीवर मला अधिकच भरोसा होता. त्याच आवेषात माझी सचिनशी लढाई झाली. मी त्याला पहिले षटक निर्धाव टाकले. त्यानंतर स्लेजिंग करताना माझ्या तोंडून काही अपशब्द बाहेर पडले. मात्र, त्यावर सचिनची प्रतिक्रिया अत्यंत वेगळी होती.”

मुश्ताक पुढे म्हणाला,

“सचिन माझ्यापाशी आला आणि म्हणाला साकी, मला बिलकुल वाटले नव्हते तू असा बोलत असशील.‌ मला वाटलेले तू खरच चांगला व्यक्ती आहे.”

आपण त्यानंतर याच गोष्टीचा विचार करत राहिलो आणि सचिनने सहज माझ्या गोलंदाजीचा समाचार घेतला, असे मुश्ताकने सांगितले.

(Saqlain Mushtaq Confession About Sachin Tendulkar Sleding In India Pakistan Match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीप्रेमींसाठी रैनाने दिली आनंदाची बातमी, आयपीएल 2024मध्येही खेळणार थाला?
’15 वर्षात एकही ट्रॉफी जिंकली नाही…’, विराटशी संवाद केल्यानंतर महिला आरसीबीने जिंकला पहिला सामना


Next Post
Cheteshwar Pujara KS Bharat

केएल राहुल की केएस भरत, कुणाला मिळणार डब्ल्यूटीसी फायनल खेळण्याची संधी?

Photo Courtesy: Twitter/WPL

पेरीने रचला विश्वविक्रम! WPL मध्ये टाकला महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

Umran-Malik-Hardik-Pandya

IND vs AUS 1st ODI । दिग्गजाने निवडली संभावित प्लेइंग इलेव्हन, प्रमुख खेळाडू संघातून बाहेर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143