‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडची इंग्लंडमध्ये पाकिस्तानचा माजी गोलंदाज साक्लेन मुश्ताक यांनी भेट घेतली.
याबद्दल त्यांनी ट्विटरवर त्यांचा आणि द्रविडचा सेल्फी शेअर केला आहे. तसेट त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘द्रविड भारताच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात तो चौथ्या क्रमांकावर आहे.’ याबरोबरच त्यांनी द्रविडला मिस्टर कूलही म्हटले आहे.
One of India’s greatest Player…The 4th highest test run scorer of all time! Mr Cool, Calm and Collected #RahulDravid pic.twitter.com/SUM7awJh8e
— Saqlain Mushtaq (@Saqlain_Mushtaq) June 27, 2018
भारतीय अ संघाचा आणि 19 वर्षांखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक असलेला द्रविड सध्या भारतीय अ संघाबरोबर इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे.
तसेच मुश्ताक हे इंग्लंड संघाचे फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे तेही सध्या इंग्लंडमध्ये आहेत.
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अ संघाने आत्तापर्यंत इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली आहे. भारतीय अ संघाने इंग्लंड लायन्स आणि विंडिज संघाबरोबर चालू अलेल्या तिरंगी वनडे मालिकेत आत्तापर्यंत 3 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवला असुन 1 सामन्यात पराभव पत्करला आहे.
तसेच या मालिकेत भारतीय संघाने अंतिम सामन्यातील स्थानही निश्चित केले आहे. या मालिकेतील अंतिम सामना 2 जुलैला भारत विरुद्ध इंग्लंड लायन्स संघात पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारताविरुद्ध वनडेसाठी इंग्लंडचा संघ घोषीत, दोन दिग्गजांचा समावेश
–जबरदस्त पुनरागमन केलेल्या स्टिव्ह स्मिथची अशी होती पहिली प्रतिक्रिया
–एकाच सामन्यात दोन दिग्गजांना टी२०मध्ये २००० धावा करण्याची संधी