पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मागच्या काही दिवसांमध्ये मोठे फेरबदल झाले. रमीझ राजा मागच्या एक वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अक्ष्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. आता त्यांच्या जागी अनुभवी नजम सेठी यांच्यी अध्यक्षस्थानी नियुक्ती झाली असून त्यांनी संघात काही महत्वाचे बदल करायला देखील सुरुवात केली आहे. आता पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांची देखील लवकरच जबाबदारीतून मुक्तता केली जाऊ शकते.
माध्यमांतील वृत्तांनुसार पीसीबीचे नवे अध्यक्ष नजम सेठी (Najam Sethi) सध्या मिकी आर्थर (Mickey Arthur) यांच्या संपर्कात आहेत. आर्थर यापूर्वी देखील पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या मार्गदर्शनात 2017 साली पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला मात देत विजेतेपद पटकावले होते. तेव्हा संघाचे कर्णधारपद सरफराज अहमद सांभाळत होता. आता सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले जात आहे की, सेठी आर्थर यांना पुन्हा संघाशी जोडण्याच्या प्रयत्नात आहेत.
आर्थरकडून हा प्रस्ताव स्वीकारला गेला, तर सकलेन मुश्ताक (Saqlain Mushtaq) यांना हे पद सोडावे लागणार, हे नक्की. आर्थर सध्या इंग्लंडमध्ये डर्बीशायर संघासोबत कार्यरत आहेत आणि त्याच्यासाठी या संघाची साथ सोडणे हा मोठा निर्णय असणार आहे. प्रशिक्षकपदासाठी सेठी इतर काही पर्यायांवर देखील विचार करत आहेत. आर्थर यांनी 2016 ते 2019 दरम्यान पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकाच्या रूपात कामकाज पाहिले आणि या काळात संघाचे प्रदर्शन देखील चांगलेच सुधारले आहे. आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक 2022 मध्ये मिळालेल्या पराभवानंतर सकलेन मुश्ताकवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच इंग्लंडविरुद्ध नुकत्याच मायदेशात पार पडलेल्या कसोटी मालिकेत देखील पाकिस्तानला पारभव स्वीकारावा लागला. कसोटी मालिका इंग्लंडने 0-3 अशा अंतराने नावावर केली.
नजम सेठी याविषयी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “माझे पहिल्यापासून असे मत आहे की, राष्ट्रीय संघासाठी आपल्याकडे विदेशी प्रशिक्षक हवा आहे, पाकिस्तानी दिग्गज नको. कोटिंग हा प्रोफेशनल बिजनेस आहे आणि आमच्याकडे कोणताच पात्र प्रशिक्षक नाहीये. दिग्गज नक्कीच आहेत, पण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पीसीबी अध्यक्ष असताना मी मिकी आर्थरसोबतच 4-5 विदेशी प्रशिक्षक नियुक्त केले होते आणि याचे परिणाम देखील पाहायला मिळाले. कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये आम्हाला पहिल्या क्रमांकाची रँकिंग मिळाली आणि संघ चॅम्पियन ट्रॉफीही जिंकली. विदेशी प्रशिक्षक मैत्री पाहत नाहीत आणि आणच्या सध्याच्या व्यवस्थेत या गोष्टीने हद्द पार केली आहे.” (Saqlain Mushtaq likely to be sacked as Pakistan coach)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! ख्रिसमसच्या दिवशी कसोटी जिंकणारा भारत केवळ तिसराच संघ, उर्वरित दोन..
या सम हाच! विरोधी खेळाडूचे कौतुक करत विराटने गिफ्ट केली स्वतःची जर्सी; सर्वत्र होतेय कौतुक