---Advertisement---

डेटिंगच्या चर्चां सुरू असतानाच सारा आणि गिलची बहीण सोबत, लेट नाईटचा व्हिडिओ व्हायरल

On: रविवार, जानेवारी 21, 2024 4:34 PM
Sara Tendulkar Shahneel Gill
---Advertisement---

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल आणि साराच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. कारण ठरत आहे नुकताच व्हायरल झालेला सारा आणि शहनील गिल या दोघांचा व्हिडिओ.

सारा तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि शुबमन गिल (Shubman Gill) एकमेकांना डेट करत आहेत, अशा चर्चा मागच्या मोठ्या काळापासून आहेत. दोघांना काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमधून एकत्र बाहेर येतानाही पाहिले गेले होते. असे असले तरी, सारा किंवा गिलपैकी एकाहीनेही अद्याप दोघांमधील नाते मान्य केले नाहीये. पण वेळोवेळी हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, याची पुष्टी करणाऱ्या गोष्टी घडत आहेत. शनिवारी (20 जानेवारी) रात्री सारा तेंडुलकर आणि शहनील गिल हिच्यासोबत नाईट आऊट करताना दिसली. शहनील ही युला सलामीवीर शुबमन गिल याची सख्खी बहीण आहे. सारा आणि शहनीलची ही भेट कॅमेरॉत कैद झाली असून व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत सारा तेंडुलकर काळ्या रंगांच्या ड्रेसमध्ये, तर शहनील गिल हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. गोधी रात्री उशीर गाडूनत जासत असतानाच कॅमेरामॅनने त्यांना स्पॉट केले. कॅमेरा पाहताच दोघीही अस्वस्थ झाल्या होत्या. सारा आपला चेहरा लपवण्याच्या प्रयत्नात होती. पण ते शक्य झाले नाही. शहनीलने तेंडूवर मास्क लावले होते.

या भेटीनंतर अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. सारा आणि शुबमनचे नाते पक्ते झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, शुबमन गिलसोबत अनेकदा बॉलिवुडची अभिनेत्री सारा अली खान हिचेही नाव जोडले गेले. पण कॉफी विथ करण शोमध्ये सारा अली खानने याविषयी स्पष्टीकरण दिले होते. सारा अली खान म्हटल्याप्रमाणे, “तुम्ही तुम्ही चुकीच्या साराला पकडले आहे. शुबमन गिलसोबत रिलेशनमध्ये असलेली सारा दुसरी आहे.” दरम्यान, सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावरून एकाच कॅफेमधील फोटो देखील पोस्ट केले होते. पण दोघे एकत्र कॅफेमध्ये होते, असे कधीच सांगितले किंवा उल्लेख केला नाहीये. (Sara Tendulkar and Shubman Gill’s sister Shahneel Gill were seen along)

महत्वाच्या बातम्या – 
‘भारताकडे ‘विराटबॉल’ आहे…’, भारतीय दिग्गजाचा कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला मोठा इशारा
IND vs ENG: जडेजा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही, पीटरसनने भारतीय फिरकीपटूचा सामना करण्यासाठी इंग्लंडला दिला मंत्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---