काल (१८ फेब्रुवारी) आयपीएल २०२१ साठी खेळाडूंचा लिलाव चेन्नई येथे पार पडला. २९२ खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होते. त्यापैकी, ५७ खेळाडूंवर बोली लागली. या ५७ खेळाडूंपैकी अखेरची बोली सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर लागली. मुंबई संघाने त्याला आधारभूत किंमतीत म्हणजे २० लाख रुपयात खरेदी केले. अनेकांनी त्यानंतर अर्जुनचे कौतुक केले. अर्जुनची बहिण सारा हिनेदेखील इंस्टाग्रामवरुन आपल्या भावाचे अभिनंदन केले.
साराने केले अर्जुनचे अभिनंदन
सचिन तेंडुलकरची मुलगी व अर्जुन तेंडुलकरची बहिण सारा हिनेदेखील इंस्टाग्रामवरुन आपल्या भावासोबतचे छायाचित्रे शेअर करत अभिनंदन केले. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोन छायाचित्रे शेअर केली. त्यामधील पहिला छायाचित्राला तिने कॅप्शन लिहिले, ‘तू मिळवलेली ही उपलब्धी तुझ्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही.’ तर दुसऱ्या स्टोरीमध्ये अर्जुन सोबतचे छायाचित्र शेअर करताना तिने लिहिले, ‘मला तुझा अभिमान आहे.’
सारा ही सातत्याने इंस्टाग्रामद्वारे वेगवेगळ्या गोष्टी सार्वजनिक करीत असते. काही महिन्यांपूर्वी तिने भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल याचे कौतुक केल्याने, दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा रंगली होती.
मुंबई संघाचा भाग बनला आहे अर्जुन
अर्जुन यापूर्वी देखील मुंबई इंडियन्स संघासोबत होता. तो गेल्या काही सत्रापासून मुंबई इंडियन्स संघात नेट बॉलरची भूमिका बजावत होता. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० मध्ये आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आली होती. तेव्हा देखील अर्जुन मुंबई इंडियन्ससोबत नेट बॉलर म्हणून उपस्थित होता. परंतु यावेळी त्याची जबाबदारी वाढली आहे. तो यावेळेस मुंबई इंडियन्स संघासोबत ड्रेसिंग रूम शेअर करणार आहे. अर्थातच तो मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
शाकिब-भज्जीची अनुभवी फिरकी जोडी केकेआरला जिंकून देणार जेतेपद? पाहा संघातील सर्व खेळाडूंची यादी
आयएसएल २०२०-२१ : कोलकता डर्बी जिंकत एटीके मोहन बागानची आघाडी भक्कम