दोन वर्ष चालत आलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारी (२३ जून) संपला. हा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड असा झाला. न्यूझीलंड संघाने संपूर्ण सामन्यात आपले वर्चस्व ठेवले. न्यूझीलंड संघाने हा सामना ८ गडी राखून जिंकला. या सामन्यानंतर आता अनेक क्रिकेट जाणकार आणि माजी खेळाडू आपआपली मत मांडत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवड समिती सदस्य सरणदीप सिंग यांनी भारतीय संघाच्या संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवड समिती सदस्य सरणदीप सिंग यांनी अंतिम सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सरणदीप यांचे म्हणणे आहे की, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक यांनी संघ निवडीमध्ये चुका केल्या. त्यांनी अंतिम ११ जणांमध्ये दोन फिरकी गोलंदाज खेळवून चुकीचा निर्णय घेतला.
सरणदीप यांनी सांगितले की, “दौऱ्यावर जाताना आपण एक पूर्ण संघ निवडत असतो. परंतु, अंतिम ११ मध्ये कोणाला स्थान द्यायचे हे कर्णधारावर अवलंबून असते. कर्णधार असतो तो मैदानात खेळणाऱ्या अंतिम ११जणांच्या संघाला निवडत असतो.” त्यांनी शार्दुल ठाकूरला संघाबाहेर केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार ठाकूरला पहिल्या १५ मध्ये नाहीतर, त्याला अंतिम ११ मध्ये स्थान दिले पाहिजे होते.
सरणदीप सांगतात की, “ठाकूरला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा त्याने गोलंदाजी सोबतच फलंदाजीतसुद्धा उत्तम प्रदर्शन केले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरसुद्धा ठाकूरने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला अंतिम ११ मधून बाहेर ठेऊन चुकी केली.”
अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या अंतिम ११ जणांच्या संघात २ फिरकी गोलंदाज आणि ३ वेगवान गोलंदाज असं संयोजन ठेवले होते. तर न्यूझीलंड संघाने अंतिम ११ जणांच्या संघात ४ वेगवान गोलंदाज आणि १ मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू असे संयोजन ठेवले होते.
सरणदीप यांनी २०१७ ते २०२० पर्यंत भारतीय क्रिकेट निवड समितीचा कार्यभार सांभाळला होता. ज्यावेळी कसोटी अंजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा सरणदीप निवड समीतीमध्ये सदस्य होते.
महत्त्वाच्या बातम्या –
ये तो होना ही था! भारताचा पराभवानंतर मांजरेकरांनी जडेजावर साधला निशाणा, पाहा काय म्हणाले
लवकरच तुटणार कोहली-शास्त्रींची जोडगोळी, ‘या’ टूर्नामेंटमधील कामगिरीवर ठरणार भवितव्य
अवघ्या ४ चेंडूत ३ विकेट्स ते २० चेंडूत अर्धशतक, पीएसएल अंतिम सामन्यात बनले ‘हे’ शानदार विक्रम