---Advertisement---

“धोनी एकदम फिट होता, त्याने टी२० विश्वचषक खेळायला हवा होता”

On: रविवार, फेब्रुवारी 21, 2021 4:12 PM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने मागीलवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने घेतलेल्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटले. सर्वांना वाटत होते की धोनी २०२० मध्ये होणारा टी२० विश्वचषक खेळणार. परंतु कोरोनाच्या कारणामुळे विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. अशातच वेळ न गमावता धोनीने निवृत्तीची घोषणा केली होती. याबद्दल आता भारतीय निवड समितीचे माजी सदस्य सरनदीप सिंग यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

धोनी फिट होता, त्याने विश्वचषक स्पर्धा खेळायला हवी होती – सरनदीप सिंग

सरनदीप सिंग यांनी एका मुलाखतीत म्हटले की, “निश्चितच, त्याने खेळायला हवं होतं. आम्ही हा देखील विचार करत होतो की, त्याने टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळायला हवी. तो एकदम फिट होता. त्याचे नाही खेळण्याचे काही कारणच नव्हते. आम्ही नेहमी खेळाडूंची फिटनेस पाहतो की तो कधीपर्यंत खेळू शकतो आणि सर्वात फिट माही होता. त्याने कधीच सरावतून सुट्टी नाही घेतली. तुम्ही पाहिलच असेल की, असे क्वचितच झाले की त्याला दुखापतीमुळे सामना खेळता आला नाही. याच कारणामुळे त्याला सर्वांकडून सन्मान मिळाला.”

तसेच पुढे ते म्हणाले, “आम्ही नेहमीच अनुभवल आहे की, एक खेळाडू ज्याने भारतीय संघासाठी इतके सामने खेळले आणि अशी एकही ट्रॉफी नसेल जी धोनीने जिंकली नसेल. तो या संधीचा हकदार आहे. निवड समितीनुसार त्याने विश्वचषक स्पर्धा खेळायला हवी होती. हे माझे वैयक्तिक म्हणणे आहे. तसेच सर्वांचे म्हणणे देखील हेच होते.”

धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला टी-२० विश्वचषक स्पर्धा २००७, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०११ आणि २०१३ साली इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिले आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा कसोटीत अव्वल क्रमांकही पटकावला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

सेहवाग-गांगुलीपेक्षा जास्त धावा केल्या, पण त्याच सामन्यात संपली कारकिर्द; शेवटी ऑस्ट्रेलियाशी मिळवला हात

भारतीय टी२० संघात सूर्यकुमार यादवची निवड होताच माजी निवडकर्त्याचे जुने ट्विट चर्चेत, ‘हे’ आहे कारण

सनरायझर्स हैद्राबादच्या खेळाडूच्या घरी चिमुकल्याचे आगमन, ट्विट करत शेअर केली आनंदाची बातमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---