टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खाननं शनिवारी आपलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं शतक झळकावलं. भारत विरुद्ध न्यूझीलंड बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी त्यानं 110 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर अत्यंत खडतर परिस्थितीत त्यानं ही कामगिरी केली. विशेष म्हणजे, सरफराज पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. दुसऱ्या डावात शतक ठोकल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं. त्याच्या शतकानंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्येही जल्लोष सुरू झाला. दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी देखील सरफराजला स्टँडिंग ओव्हेशन दिलं.
26 वर्षीय सरफराजनं टीम साऊदीच्या 57व्या षटकात चौकार मारून 100 धावा पूर्ण केल्या. शतकानंतर त्यानं हेल्मेट काढलं आणि मैदानाभर धावत आनंद साजरा केला. यावेळी क्रीझवर दुसऱ्या टोकाला उपस्थित असलेल्या रिषभ पंतनं देखील त्याचं कौतुक केलं. ड्रेसिंग रूममध्ये विराट-रोहित आणि इतर भारतीय खेळाडूंनी उभं राहून टाळ्या वाजवत सरफराजचं अभिनंदन केलं. सरफराजनं शतक झळकावल्यानंतर विराट आणि रोहितचा आनंद गगनात मावत नव्हता. या दोघांची प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही सरफराज्या सेलिब्रेशनचा आणि रोहित-विराटच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
CELEBRATION BY SARFARAZ KHAN WHEN HE COMPLETED THE MAIDEN HUNDRED 🥶 pic.twitter.com/PsbxlNya0t
— Johns. (@CricCrazyJohns) October 19, 2024
THE ROAR OF SARFRAZ KHAN 🐯🌟 pic.twitter.com/IMYx3NTp9m
— Johns. (@CricCrazyJohns) October 19, 2024
शुक्रवारी (18 ऑक्टोबर) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सरफराजनं विराट कोहली (70) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली होती. मात्र विराट बाद झाल्यानंतर त्यानं रिषभ पंतसोबत मोर्चा सांभाळला. शनिवारी 71 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला, तेव्हा दुसऱ्या डावात भारताची धावसंख्या 344 होती. सरफराज 125 आणि पंत 53 धावांवर नाबाद होते. भारताचा पहिला डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला होता. त्यानंतर न्यूझीलंडनं 402 धावा केल्या.
हेही वाचा –
ind vs nz; सर्फराज खानचे मेडन शतक, टीम इंडिया 300 पार…
पाकिस्तान संघाला मिळाला नवा कर्णधार! हा खेळाडू घेणार बाबर आझमची जागा
ऋतुराज गायकवाड होणार कर्णधार! ईशान किशनचेही नशीब चमकणार; AUS दौऱ्याबाबत मोठे अपडेट